... अन् दुर्गराज रायगड झाला शिवमय, पहा नयनरम्य PHOTO

शिवभक्तांच्या गर्दीने फुललेल्या गडावर जणू साडे तीन वर्षांपूर्वीचा काळ अवतरला.
Shivrajyabhishek Photo 2020
Shivrajyabhishek Photo 2020sakal
Updated on
Summary

ढगाळ वातावरणात ढोलचा ठेका सुरू झाला. ध्वनीक्षेपकावर शाहिरीचा स्वर घुमला तसे ऐतिहासिक बाराबंदीचे पोशाख शिवभक्तांच्या अंगावर चढले. शिवभक्तांच्या गर्दीने फुललेल्या गडावर जणू साडे तीन वर्षांपूर्वीचा काळ अवतरला. (Shivrajyabhishek Din 2022) राजसदरेवर युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवराई सुवर्ण नाण्यांच्या प्रतिकृतींचा अभिषेक होताच शिवछत्रपतींच्या जयघोषाने गड दुमदुमला आणि गर्दीचा उच्चांक गाठत शिवराज्याभिषेक सोहळा अविस्मरणीय ठरला. (Shivrajyabhishek Photo 2020) हे सर्व नयनरम्य छायाचित्र टिपलेत 'दीपक सपाटे' यांनी...

भल्या पहाटेच शिवभक्तांना जाग आली. होळीच्या माळावर ढोलची दोर कलाकारांच्या गळ्यात अडकली. नियंत्रण कक्षातील ध्वनीक्षेपकावरुन शाहिरीचा आवाज गगनात भिडला तशी गडाच्या प्रत्येक कोपऱ्यात चैतन्याची लाट पसरली.
भल्या पहाटेच शिवभक्तांना जाग आली. होळीच्या माळावर ढोलची दोर कलाकारांच्या गळ्यात अडकली. नियंत्रण कक्षातील ध्वनीक्षेपकावरुन शाहिरीचा आवाज गगनात भिडला तशी गडाच्या प्रत्येक कोपऱ्यात चैतन्याची लाट पसरली. sakal
राजदरबारात ठिय्या मांडलेले शिवभक्त बेभान झाले. शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर शिवचरित्रातील एकेक प्रसंग उलगडले जात असताना त्यांच्यातील ऊर्जा जयघोषातून बाहेर पडत गेली.
राजदरबारात ठिय्या मांडलेले शिवभक्त बेभान झाले. शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर शिवचरित्रातील एकेक प्रसंग उलगडले जात असताना त्यांच्यातील ऊर्जा जयघोषातून बाहेर पडत गेली. sakal
जिल्हा परिषदेच्या शेडमधून फुलांनी सजलेली शिवछत्रपतींची पालखी होळीच्या माळाच्या दिशेने मार्गस्थ झाली. हातात तलवार, भाला, तीर कमान, विटा घेऊन रणमर्द शिलेदार पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
जिल्हा परिषदेच्या शेडमधून फुलांनी सजलेली शिवछत्रपतींची पालखी होळीच्या माळाच्या दिशेने मार्गस्थ झाली. हातात तलवार, भाला, तीर कमान, विटा घेऊन रणमर्द शिलेदार पालखी सोहळ्यात सहभागी झाले. sakal
नगारखान्यातून पालखीने राजदरबारात प्रवेश करताच शिवभक्तांच्या नजरा पालखीकडे वळल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणांनी सारा परिसर दणाणला.
नगारखान्यातून पालखीने राजदरबारात प्रवेश करताच शिवभक्तांच्या नजरा पालखीकडे वळल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणांनी सारा परिसर दणाणला. sakal
संभाजीराजे व शहाजीराजे यांचे याचवेळी आगमन झाले आणि शिवभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला. शिवछत्रपतींच्या उत्सव मूर्तीवर जलाभिषेक व दुग्धाभिषेक झाल्यानंतर संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर शिवराई सुवर्ण होनांचा अभिषेक घालण्यात झाला.
संभाजीराजे व शहाजीराजे यांचे याचवेळी आगमन झाले आणि शिवभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला. शिवछत्रपतींच्या उत्सव मूर्तीवर जलाभिषेक व दुग्धाभिषेक झाल्यानंतर संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर शिवराई सुवर्ण होनांचा अभिषेक घालण्यात झाला.sakal
राजसदर, नगारखाना, बाजारपेठमार्गे जगदीश्वर मंदिराकडे पालखी मिरवणूक काढण्यात आली. जगदीश्वर व शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली.
राजसदर, नगारखाना, बाजारपेठमार्गे जगदीश्वर मंदिराकडे पालखी मिरवणूक काढण्यात आली. जगदीश्वर व शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली. sakal
गडावरील विठ्ठल औकिरकर कुटुंबियांनी वंश परंपरेने जपलेले शिवराई सुवर्ण होन गतवर्षी संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्या नाण्याच्या प्रतिकृतींनी अभिषेक घालण्यात आला.
गडावरील विठ्ठल औकिरकर कुटुंबियांनी वंश परंपरेने जपलेले शिवराई सुवर्ण होन गतवर्षी संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्या नाण्याच्या प्रतिकृतींनी अभिषेक घालण्यात आला. sakal
शाहीर राजेंद्र कांबळे यांनी 'संभाजीराजे आपल्या दारी स्वराज्य आणायचं हाय,' 'शिव-शाहूंचा वारस आला संभाजी राजा,' गीते सादर करत माहोल शिवमय केला. या गीतांवर शिवभक्त बेभान होऊन डोलले.
शाहीर राजेंद्र कांबळे यांनी 'संभाजीराजे आपल्या दारी स्वराज्य आणायचं हाय,' 'शिव-शाहूंचा वारस आला संभाजी राजा,' गीते सादर करत माहोल शिवमय केला. या गीतांवर शिवभक्त बेभान होऊन डोलले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com