शिवसृष्टीची दुरावस्था

Wednesday, 23 September 2020

शहराची शान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्युरल्स द्वारे नवीन पिढीला सांगणाऱ्या शिवसृष्टीची खूपच दुरावस्था झालेली आहे. महापालिकेने लांडेवाडी चौकात उभारलेल्या या शिल्पांभोवतालची सुशोभीकरणाची झाडे वाढलेली आहेत. तेथील पथदिवे तुटलेले असून रात्री तेथे अंधार असतो. शिवसृष्टी समोर नो पार्किंग असताना देखील तेथे सर्रास खाजगी वाहने पार्क केलेली असतात. त्या वाहनांवर कुठल्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. पालिका लाखो रुपये खर्च करून शहरात अशा विविध प्रकारच्या वास्तू उभ्या करते पण नंतर त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. (फोटो - संतोष हांडे)