esakal | महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी अभिनेत्रींचा मराठमोळा लूक

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी अभिनेत्रींचा मराठमोळा लूक
By
टीम ई सकाळ
Marathi actresses

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना उर्मिला कोठारे महाराष्ट्र दिनानिमित्त रूबाबदार लूकमध्ये पाहायला मिळाली. बुलेटवर बसून तिने एक खास फोटोशूट केले आहे. उर्मिलाने निळ्या रंगाची नऊवारी साडी, फेटा आणि गॉगल असा हटके लूक केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णीने महाराष्ट्र दिनानिमित्त रॉयल लूक केला आहे. सोनालीने जांभळ्या रंगाची काठपदराची साडी नेसली असून कपाळावर तिने चंद्रकोर लावली आहे. सोनालीने पारंपारिक दागिने देखील घातले आहेत. या शाही लूकमध्ये सोनाली खूप सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अमृताने महाराष्ट्रीयन लूक केला आहे. हिरव्या साडीमध्ये अमृता अतिशय सुंदर दिसत आहे. तसेच हिरव्या रंगाच्या नथीमुळे तिच्या लूकची शोभा अजून वाढली आहे.

अभिनेत्री प्रिया बापटने भगव्या रंगाच्या नऊवारी साडीमधील अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने नथ कमर पट्टा, पारंपारिक दागिने घातले आहेत.

आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. वैदेहीने महाराष्ट्र दिनानिमित्त निळ्या रंगाच्या काठपदराच्या साडीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमधील वैदेहीच्या नथीच्या हारने सर्वांचे लक्ष वेधले.