sakal

बोलून बातमी शोधा

Swasthyam : बीपीचा त्रास आहे तर चुकून ही हे प्राणायाम करू नका, जाणून घ्या काय घ्यावी काळजी

Swasthyam

आपण कुठेही बसून प्राणायाम करू शकता. फक्त ती जागा मोकळी आणि हवेशीर असेल, तर अधिक चांगले. प्राणायाम करण्यासाठी सकाळची सूर्योदयाची वेळ ही सर्वांत योग्य मानली जाते. तसेच, आपण संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीही प्राणायाम करू शकतो.प्राणायाम सकाळी पोट रिकामे असेल, तेव्हा करायला हवे. तसेच, आपण अल्पोपहार केला असेल, अथवा चहा घेतला असेल, तर कमीत कमी दोन तासांनंतर प्राणायाम करावे.

प्रथम श्वास कसा घ्यावा व कसा सोडावा याचा अभ्यास करावा, प्राणायाम करताना कंफर्टेबल आसनात बसून करावे, प्राणायाम करताना घाई करू नये.

प्राणायाम करतेवेळी आरामदायी कपडे परिधान करावेत. जास्त टाईट कपडे घालू नयेत.

प्राणायामामध्ये सराव महत्त्वाचा आहे. तसेच, प्राणायाम करत असताना आजूबाजूची हवा शुद्ध व वातावरण स्वच्छ असणे आवश्यक आहे.

प्राणायाम हे काळजीपूर्वक करायला हवेत. कोणतेही पुस्तक व व्हिडिओ बघून प्राणायाम केले, तर त्याचे परिणाम योग्य मिळतातच असे नाही.  उदाहरणार्थ, एखाद्याला बीपीचा त्रास असेल, तर त्यांनी कपालभाती करू नये. तसेच, थंडीमध्ये शीतली प्राणायाम करायचा नसतो.

प्राणायाम करताना तुमचे लक्ष श्वासावर असणे खूप महत्त्वाचे आहे.

प्राणायाम व योगसाधना करताना निरोगी जीवनासाठी चार मुलभूत गोष्टी आवश्यक आहेत. एक चांगला व्यायाम, दुसरे योग्य पोषक व सकस आहार, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीची शांत झोप आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन. या चारही गोष्टींचे प्रत्येकाने नियमित पालन केले, तर शरीर सुदृढ व निरोगी राहीलच, शिवाय मानसिक ताण-तणावाचे अतिशय चांगल्या प्रकारे समायोजन होते.

टॅग्स :yogapranayamYog