sakal

बोलून बातमी शोधा

तान्हा पोळा; नागपुरात कसा साजरा होतो हे पहा फोटोंमध्ये

तान्हा पोळा; नागपुरात कसा साजरा होतो हे पहा फोटोंमध्ये

नागपूर : कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात यंदा तान्हा पोळा भरणार नाही. हा सण सार्वजनिक साजरा झाल्यास कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या पोळ्याची लहान मुलं आतुरतेने वाट पाहत असतात. यासाठी ते तयारीही करतात. वेगवेगळ्या वेशभूषा धारण करण्यापासून बैलांना सजवण्यापर्यंत त्याची तयारी असते. यात आकर्षक वेशभूषा आणि चांगल्या नंदीला पुरस्कार मिळतो. यामुळे मुलांना याची जास्त आवड असते. मागच्यावर्षीप्रमाणे यंदाही पोळा भरणार नाही. मात्र, तो कसा साजरा केला जाते, हे आपण फोटोंच्या माध्यमातून पाहू या... (छायाचित्र - प्रतीक बारसागडे)

तान्हा पोळ्यासाठी लहान मुलांसह नागरिकांनी केलेली गर्दी

तान्हा पोळ्यासाठी लहान मुलांसह नागरिकांनी केलेली गर्दी

तान्हा पोळ्यात सजवलेल्या बैलांसह एका रांगेत उभे असलेले चिमुकले

तान्हा पोळ्यात सजवलेल्या बैलांसह एका रांगेत उभे असलेले चिमुकले

तान्हा पोळ्याच्या निमित्ताने वाहनचालकांना दुचाकी घालण्याचे महत्त्व समजावून सांगताना चिमुकला

तान्हा पोळ्याच्या निमित्ताने वाहनचालकांना दुचाकी घालण्याचे महत्त्व समजावून सांगताना चिमुकला

शेतकऱ्याची वेशभूषा परिधान करून आलेला मुलगा

शेतकऱ्याची वेशभूषा परिधान करून आलेला मुलगा

शंकराच्या वेशेत आलेला मुलगा

शंकराच्या वेशेत आलेला मुलगा

विठ्ठल रखुमाई यांची वेशभूषा परिधान करून सहभागी झालेले चिमुकले

विठ्ठल रखुमाई यांची वेशभूषा परिधान करून सहभागी झालेले चिमुकले

चिमुकली चक्क वृत्तपत्रापासून तयार केलेले कपडे परिधान करून पोळ्यात सहभागी झाली आणि महत्त्व समजावून सांगत आहे.

चिमुकली चक्क वृत्तपत्रापासून तयार केलेले कपडे परिधान करून पोळ्यात सहभागी झाली आणि महत्त्व समजावून सांगत आहे.

टॅग्स :festivalTanha Pola