Sat, August 13, 2022
असा करा तणाव दूर; सोपे आणि सहज उपाय करून बघा
Published on : 28 October 2021, 3:31 pm
नागपूर : ताणतणाव हा सध्याच्या जीवनशैलीचा एक भाग झाला आहे. परंतु, त्याला प्रयत्नपूर्वक दूर सारायला हवे. थोडा विचार केला तर त्याचे व्यवस्थापन करता येते. स्वप्रतिमा उंचावणे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आपणच आपल्याला कमी लेखू लागलो की, स्वप्रतिमा खालावते आणि नैराश्यग्रस्त होण्यास वेळ लागत नाही. यासाठी सर्व व्यक्ती आणि घटनांकडे सकारात्मकतेने पाहणे ही पहिली महत्त्वाची बाब आहे.