PHOTO STORY | आठवण महामानवाची! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा ऑ| | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठवण महामानवाची! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा

Dr. Babasaheb Ambedkar

भीमराव रामजी आंबेडकर उर्फ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं भारताच्या इतिहासातील योगदान सर्वपरिचित आहे. डॉ. आंबेडकरांनी आपलं संपूर्ण आयु्ष्य भारत देशासाठी खर्ची घातलं. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. भारतीय संविधानातील त्यांच्या अमुल्य योगदानामुळे त्यांना 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' असं म्हटलं जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील इंदौर जिल्ह्यामधील 'महू' येथे झाला.

त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखलं जाते.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी  इकोनॉमिक्समध्ये पी.एच.डी. मिळवली. असे करणारे ते पहिलेच भारतीय होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, पारशी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच इ. भाषा त्यांना अवगत होत्या.

डॉ. आंबेडकर यांच्या 'The Problem of the Rupee – Its origin and its solution' पुस्तकाच्या आधारावर 'रिझर्व बँक ऑफ इंडिया'ची पायाभरणी झाली.

तत्कालीन भारतीय समाजात अस्पृश्यांना दिली जाणारी हीन वागणूक डॉ. आंबेडकरांनी स्वतः अनुभवली होती. त्यामुळे त्यांच्या हक्कांसाठी ते आयुष्यभर झटले.

'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा', असा संदेश त्यांनी जनतेला दिला.

व्हू वेअर शुद्राज?, बुद्ध अँड हिज धम्म, द अनटचेबल्स, कास्ट्स इन इंडिया, रानडे-जिना आणि गांधी असे अनेक ग्रंथ व पुस्तके त्यांनी लिहीली.

14 ऑक्टोंबर 1956 : नागपूर येथे  5,00,000 अनुयायांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथील राहत्या घरी झोपेत असताना या महामानवाचं महापरिनिर्वाण झालं. दलितांचा कैवारी अनंतात विलीन झाला.

31 मार्च 1990 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

मुंबईतील दादर येथील 'चैत्यभूमी' येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे.