बॉलीवूडच्या अभिनेत्रींचा थाटबाट बघायला चाहते कायमच उत्सुक असतात.त्यांच्या खानपानापासून ते त्यांच्या हेल्थकेअर पासून ते त्यांच्या लाईफस्टाईलपर्यंत सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना जाणून घ्यायच्या असतात.बॉलीवूडच्या सगळ्या अभिनेत्री वेगवेगळ्या कारमधे फिरताना तुम्हाला नेहमीच दिसतात.पण त्यांच्या या कारची किंमत ऐकून तुम्ही भारावून जाल.
या यादीमधे पहिलं नाव येतं ते मलाईकाचं.या अभिनेत्रीच्या कारची किंमत बघून तुम्हीही चकितच होणार आहात.तीच्या 'Range Rover Vogue' या तीच्या कारची किंमत २.१० करोड एवढी आहे.
योगा गर्ल शिल्पा शेट्टी हीसुद्धा यात मागे नाही.तीचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो.तीच्याजवळही १.६१ करोड किमतीची 'Range Rover Vogue' कार आहे.
सोशल मीडिया फेम आणि सोशल मीडियावर अॅक्टिव असणारी नेहा धुपिया हिलादेखील महागड्या कारचं वेड असल्याचं दिसून येतं.'BMW X5 ही ७६.५०' लाखाची कार नेहाकडे बघायला मिळते.नेहा ही चित्रपटात तुम्हाला अॅक्टिव दिसत नसली तरी ती बऱ्याच रिअॅलीटी शो मधे तुम्हाला बघायला मिळेल.
बर्फी या चित्रपटातून बॉलीवूडमधे एन्ट्री करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री इलिआना डिक्रूज हिच्याजवळही कारचं चांगलं कलेक्शन आहे.'Mercedes GLC 300' ही ६७.९८ लाख किमतीची कार तीच्या जवळ आहे..या यादीत इलिआनाचा क्रमांक तुम्हाला तीसरा दिसून येईल.
तापसी पन्नू ही अभिनेत्री देखिल या यादीत मागे नाही.तीच्याकडेही Mercedes 'GLE 250D ही ६७.१५' लाखाची महागडी कार दिसेल.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.