Top Safe Places for Women Solo Trip: अनेक महिलांना फिरायला जायची हौस असते. परंतु त्या सोलो ट्रिपवर जायला घाबरतात. त्यामुळे त्यांच्या फिरण्यावर बंधणं येतात. म्हणूनच आज आपण अशा काही ठिकाणांची चर्चा करणार आहोत, ज्याठिकाणी महिलाही बिनधास्तपणे फिरु शकतात. या सुरक्षित ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटू शकते.
1. हम्पी- आंध्रप्रदेशातील हम्पी हे शहर महिलांना फिरण्यासाठी अतिशय सुरक्षित ठिकाण आहे. हे ठिकाण प्राचीन मंदिरं तसेच वास्तसाठी प्रसिद्ध आहे.
2. वायनाड- केरळमधील हे प्रसिद्ध ठिकाण चहांच्या सुंदर बागांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय येथील निसर्गसौंदर्य अद्भुत आहे. या ठिकाणी महिला एकट्या फिरू शकतात.
3. सिक्कीम- भारताच्या या सुंदर ठिकाणी अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. बर्फाच्छादित पर्वतांच्या सानिध्यात असलेल्या सुंदर बौद्ध मठांना तुम्ही भेट देऊ शकतात.
4. जयपुर- महिलांना एकटे फिरायचे असेल तर जयपूर एक सुरक्षित जागा आहे. जयपूरमधील रॉयल महाल आणि किल्ल्यांसाठी ओळखला जातो.
5. रोज गार्डन- चंदिगढस्थित रोज गार्डनमध्ये महिला निर्धास्तपणे फिरु शकतात. रोड गार्डन आशियातील सर्वात मोठं गुलाबांचे गार्डन आहे.
6. कुफरी- हिमाचल प्रदेशातील शिमल्याजवळील हे एक छोटंस हिलस्टेशन आहे. कुफरी महिलांसाठी एक सुरक्षित स्थान आहे.
7. लेह -लडाख- लडाखमधील झास्कर घाटी भारताच्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथे 9 महिने हिमवर्षा होते. येथेही महिला एकट्या प्रवास करू शकतात.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.