- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- निवडणूक
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
Tourism : आता परदेशात प्रवास करणं हे 'स्वप्न' राहणार नाही; कमी बजेटमध्ये करा 'या' देशांचा प्रवास

बहुतेक लोकांना प्रवास करणं आणि जीवनात नवीन ठिकाणं शोधणं आवडतं. परदेश प्रवास करणं हे जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु, परदेशात अधिक खर्च करण्याचा विचार करून अनेकांचं हे स्वप्न अपूर्णच राहतं. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत, जिथं तुम्ही कमी बजेटमध्ये परदेशात फिरण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता.

थायलंड (Thailand) पाहण्यासाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे. थायलंडच्या तिकिटासाठी तुम्हाला फक्त 40 हजार रुपये खर्च करावे लागतील. बँकॉकमधील नाईटआउटची मजा तुम्ही इथं घेऊ शकता. इतकं ते सुंदर आहे.

फिलिपाइन्सला (Philippines) जाणाऱ्यांसाठी असं म्हणतात की, जो एकदा तिथं जातो तो पुन्हा जाण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. इथं जाण्यासाठी तुम्हाला सुमारे 40 हजार रुपयांचं तिकीट मिळेल. पण, इथं राहण्यासाठी जेवण फार महाग नाहीय. फिलिपाइन्सच्या किनाऱ्यावर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.

ओमानला (Oman) पर्शियन रत्न म्हटलं जातं. ओमानमध्ये तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावरील सूर्यप्रकाश, वन्यजीव आणि ऐतिहासिक वारसा यांचा आनंद घेऊ शकता. या सुंदर देशाच्या भेटीदरम्यान, त्याची राजधानी मस्कतला भेट देण्यास विसरू नका. इथं तुम्हाला ओमानला भेट देण्याचा खरोखर आनंद होईल. दिल्लीहून विमान प्रवासाचा खर्च 20 हजारांपेक्षा कमी आहे.

हिमालयाच्या कुशीत असलेला नेपाळ (Nepal) हा सुंदर देश पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय प्रेक्षणीय मानला जातो. इथं तुम्ही तुमच्या बजेटमध्ये प्राचीन मंदिरं, सुंदर वास्तुकला, बाजार आणि स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकता. कमी बजेटमध्ये तुम्हाला नेपाळमध्ये हॉटेल किंवा लॉज सहज मिळून जाईल.

भारताचा शेजारी देश भूतान (Bhutan) हा देखील परदेश प्रवासासाठी चांगलं ठिकाण आहे. प्राचीन मठ आणि नैसर्गिक सौंदर्यानं सजलेल्या भूतानला भेट देण्यासाठी तुम्हाला 4 ते 5 दिवस लागू शकतात. भूतानला जाण्यासाठी तुमच्या तिकिटाची किंमत 20 हजार रुपये आहे.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.