फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रातलं जवळ जवळ सर्वांच्या ओळखीतलं नाव म्हणजे स्वप्नील शिंदे.आता मात्र स्वप्नीलची ओळख सायशा अशी झाली आहे.सायशाने आता तीच्या फॅशन डिझाइनिंगच्या करियरला राम राम करण्याचा निर्णय घेतलाय.
स्वप्नील शिंदे हा फॅशन डिझाइनर एका वर्षापूर्वी स्वप्नीलची सायशा झाली.ट्रान्सजेंडर प्रोसेसने स्वप्नीलने त्याचे जेंडर बदलून स्वत:ला 'सायशा' करून घेतले.
सायशा नुकतीच कंगनाच्या 'लॉकअप शो' मधे सहभागी झालेली दिसली होती.या शो मधे 'लॉक अप शो'चा विजेता मुन्नवर फारूकी व सायशाची केमेस्ट्री चांगली जुळून आलेली दिसली होती.
मुन्नवर फारूकीच्या यशाबद्दल सायशाने त्याचे कौतुकही केले आहे.
तीच्या मते स्वप्नीलची सायशा झालेल्या सायशाला जीवनात दुसरी संधी मिळाली आहे.आणि त्या संधीचा उपयोग आता तीला अभिनयाच्या जगात करून घ्यायचा आहे.
त्यासाठी सायशाने आता फॅशन डिझाइनिंगच्या करियरला रामराम करत तीचे करियर अभिनयाच्या क्षेत्रात आजमावण्याचे ठरवले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.