Promise Day 2022: जोडीदाराला काय गिफ्ट द्यायचं प्रश्न पडलाय! हे घ्या उत्तर
व्हेलेंनटाईन वीक मधला आणखी एक महत्वाचा दिवस असतो प्रॉमिस डे. या दिवशी कपल्स एकमेंकांबरोबर आयुष्यभर राहण्याचं, एकमेकांचं रक्षण करण्याचं, संकटात साथ देण्याचं वचन देत असतात. म्हणून तर प्रेमी जीवांसाठी व्हेलेंनटाईन वीकदरम्यानचा हा दिवस खूप महत्वाचा असतो. तिला किंवा त्याला आयुष्यभर चांगली साथ देण्याचं प्रॉमिस तुम्हाला पुन्हा द्यायचंय का? द्याचं. पण असं करताना तिला किंवा त्याला छानसं गिफ्ट घेऊन जा, असं केल्याने छान परिणाम तर होईलच पण तुमचं नातं (Relation) अधिक घट्ट होईल. यासाठी हे पर्याय उपलब्ध आहेत.(Gift Ideas for Promise Day)
१) व्हेलंटाईन प्रॉमिस फोटो फ्रेम (Valentine Promise Sandwich Photo Frame)- यावर तुम्ही तुमच्या दोघांचा फोटो लिहून आवडता संदेश लिहू शकता. अशा प्रकारच्या फ्रेमवर लाकडी सजावट केलेली आहे. तुम्ही एकमेकांबरोबर आयुष्य काढणार आहात याची जाणीव ही फ्रेम तुम्हाला सतत देईल.
२) बास्केट. (Personalized Basket Of Love) प्रेमाचे हे बास्केट जोडीदाराला खूप आवडू शकते. तुमच्या जोडीदाराला आवडणाऱ्या अनेक गोष्टी यात असतील. त्याला आवडणाऱ्या गोष्टींबरोबरच, चॉकलेट, हृदयाच्या आकाराचा बॉक्स, 4 कँडी लॉलीपॉप, लाकडी स्टँडसह एक व्यंगचित्र असे बरेच काही तुम्हाला गिफ्ट करता येईल.
३) प्लांटर्स (Personalized Planters ) - हे प्लांटर्स एकावेळी दोन खरेदी करता येतात. सिरॅमिकच्या या प्लांटर्समध्ये एकावर चांगला मेसेज लिहिता येतो. तसेच तुमच्या दोघांचे फोटो लावता येऊ शकतात. महत्वाचे म्हणजे तुम्ही कमी जागेत छोटंस झाडही लावू शकता.
४) कुशन (Personalised Cushion) - तुम्ही अशाप्रकारे कुशन तयार करून घेऊन गिफ्ट करू शकता. यामुळे तुमचा जोडीदार नेहमी तुमच्यासोबत आणि पाठीशी आहे, याची तुम्हाला खात्री वाटेल. तुम्ही कुशनवर आवडीचा संदेश आणि तुम्हा दोघांचा फोटो टाकून घेऊ शकता. यामुळे रात्रीही तुम्हाला तुमचा जोडीदार तुमच्या सोबत आहे अशी भावना निर्माण होऊन शांत झोप लागेल.