भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आज मोहालीत आपला शंभरावा कसोटी सामना (Virat Kohli 100th Test) खेळत आहे. विराट कोहलीसाठी हा एक माईल स्टोन आहे. या विशेष क्षण साजरा करण्यासाठी बीसीसीआयने (BCCI) सामना सुरू होण्यापूर्वी एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला टीम इंडियाचे सर्व खेळाडू संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील उपस्थित होती. या कार्यक्रामाचे काही निवड खास फोटो (Romantic Photos) तुमच्यासाठी एका क्लिकवर..
विराट कोहली आज मोहालीवर आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहे. सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने मैदानावर एक कार्यक्रम आयोजित केला होता.
विराट कोहलीला त्याची 100 वी ब्लू बॅगी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या हस्ते देण्यात आली.
मैदानावरील कार्यक्रमावेळी टीम इंडियातील खेळाडूंबरोबरच विराटची पत्नी अनुष्का शर्मा देखील उपस्थित होती.
विराट कोहलीने 100 कसोटीचा माईलस्टोन गाठल्याने अनुष्का खूष होती.
विराट कोहलीला अनुष्का शर्मा कायम मैदानावर येऊन प्रोत्साहन देत असते.
शंभराव्या कसोटीच्या विशेष क्षणी विराट आणि अनुष्काने फोटोशूट देखील केले.
विराट कोहलीसाठी 100 वा कसोटी सामना खूप खास आहे. या खास कसोटीसाठी अनुष्का शर्माने आलिंगन देत विराटला शुभेच्छा दिल्या. आता विराटने शतक ठोकून रिटन गिफ्ट द्यावे
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.