sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli : रेकॉर्ड बोलतात! टी 20 'मास्टर' रोहितवरही किंग कोहली पडला भारी

Virat Kohli T20 World Cup Records

विराट कोहलीने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरूद्ध शतक ठोकत आपला शतकांचा दुष्काळ संपवला होता.

या ऐतिहासिक 71 व्या शतकानंतर विराट फक्त जुन्या फॉर्ममध्ये परतला नाही तर एका पाठोपाठ एक विक्रम पादाक्रांत करण्याचा कारखाना पुन्हा सुरू झाला.

या कारखान्याची उत्पादन क्षमता ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये आपल्याला दिसत आहे.

विराट कोहलीने बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात 15 धावा करताच महेला जयवर्धनेचा टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा (1016) करण्याचा विक्रम मोडला. आता हा विक्रम (1065*) विराटच्या नावावर आहे.

याचबरोबर विराट कोहलीचा टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सरासरी राखण्यातही कोणी हात धरत नाही. या यादीत तो 88.8 सरासरी राखत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर असलेला माईक हसीची सरासरी 54.6 आहे. सध्या तरी विराटच्या आसपास कोणी नाही.

विराट टी 20 वर्ल्डकपमध्ये अर्धशतकांचा रतीब घालण्यात देखील आघाडीवर आहे. त्याने या बाबतीत रोहित शर्माला देखील मागे टाकले. विराट कोहलीने आतापर्यंत टी 20 वर्ल्डकपमध्ये 13 अर्धशतके ठोकली आहेत. तर या यादीत 9 अर्धशतके करणाऱ्या रोहित शर्मा आणि ख्रिस गेलचा संयुक्तरित्या दुसरा क्रमांकावर आहेत.