जगातील सर्वात लहान तोफ पाहिली का? वाचा कुणी केलीय ही कलाकारी

औरंगाबादमधील विठ्ठल गोरे यांनी 5 मिमी लांबी आणि केवळ 140 मिलिग्रॅम वजनाची तोफ बनवली आहे
cannons
cannonssakal
Updated on

औरंगाबादमधील विठ्ठल गोरे यांनी 5 मिमी लांबी आणि केवळ 140 मिलि ग्रॅम वजनाची तोफ बनवली आहे. ही तोफ उडवता येऊ शकेल अशी रचना केलेली आहे पण ही तोफ बनवणाऱ्या विठ्ठल गोरे यांचा प्रवास फक्त तोफ बनवण्यापुरता मर्यादित नाहीये. विठ्ठल यांचा प्रवास त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊया. (Vitthal Gore from Aurangabad has made probably the smallest cannon in the world.)

विठ्ठल गोरे  म्हणतात,  "इतिहासाची आवड असल्याने तोफांची निर्मिती करत असताना काही लहान तोफांची निर्मिती केली. मग सुरू झाला छोट्या तोफेच्या निर्मितीचा प्रयत्न. त्याच प्रयत्नातून भारतातील सर्वात लहान तोफेची निर्मिती करण्याची आयडिया मनात आली अन मग ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी काम करू लागलो.मी तयार केलेली तोफ ही बहुधा जगातील सर्वात लहान तोफ आहे."

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील शेतकरी कुटुंबातील विठ्ठल उत्तमराव गोरे
सर्वसामान्य कुटुंबातुन येतात. शेतकरी मायबापाकडे इतका पैसा नसल्यामुळे त्यांनी 12 वी नंतर शिक्षण सोडले.
पुढे आपसूकच पोटापाण्यासाठी काम शोधण्यासाठी औरंगाबादकडे पावले वळवली.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील शेतकरी कुटुंबातील विठ्ठल उत्तमराव गोरे सर्वसामान्य कुटुंबातुन येतात. शेतकरी मायबापाकडे इतका पैसा नसल्यामुळे त्यांनी 12 वी नंतर शिक्षण सोडले. पुढे आपसूकच पोटापाण्यासाठी काम शोधण्यासाठी औरंगाबादकडे पावले वळवली.
ते सांगतात, "सुरुवातील कंपनीत लहानलहान कामे शिकू लागलो. बारकाईने निरिक्षण करु लागलो. पुढे मग हळूहळू वेगवेगळ्या मशिन हाताळू लागलो. 14 वर्षे मी कंपनीत कामे केलं आणि नंतर मग मी माझं स्वतः वर्कशॉप सुरु केलं.आज माझ्या वर्कशॉपला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. माझ्याकडे कोणतीच डिग्री नाही आहे.कौशल्यावर भर देत मित्रांचे  इंजिनिअरिंगचे पुस्तके वाचून मी इंजिनिअर झालोय आणि मशिन कशा तयार करायच्या हे शिकलो आणि जिद्दीने काम करू लागलो ."

आज त्यांच्या हाताखाली दहा लोक काम करतात. महाराष्ट्र सोबत इतर अनेक राज्यात मशिन सप्लाय करतो.
औरंगाबादमधील चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात 'शिव कृष्णा इंडस्ट्रीज' नावाचा मशिनरी निर्माण करण्याचा कारखाना आहे.
विठ्ठल सांगतात की माझ्यासोबत माझे बिझिनेस पार्टनर योगेश भोसले यांचेही आशा ऐतिहासिक वस्तु निर्मिती करण्यासाठी मोलाचं सहकार्य असतं.
हे सगळं करत असताना मला इतिहासाची प्रचंड आवड  असल्यामुळे मी गडकिल्लांची भटकंती करणे, इतिहासावरचे अनेक पुस्तके वाचणे, ऐतिहासिक गोष्टीचे बारीक निरिक्षण करुन त्याच्या प्रतिकृती तयार करुन पाहणे अशा गोष्टी मी छंद म्हणून जोपासू लागलो.
आज त्यांच्या हाताखाली दहा लोक काम करतात. महाराष्ट्र सोबत इतर अनेक राज्यात मशिन सप्लाय करतो. औरंगाबादमधील चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात 'शिव कृष्णा इंडस्ट्रीज' नावाचा मशिनरी निर्माण करण्याचा कारखाना आहे. विठ्ठल सांगतात की माझ्यासोबत माझे बिझिनेस पार्टनर योगेश भोसले यांचेही आशा ऐतिहासिक वस्तु निर्मिती करण्यासाठी मोलाचं सहकार्य असतं. हे सगळं करत असताना मला इतिहासाची प्रचंड आवड असल्यामुळे मी गडकिल्लांची भटकंती करणे, इतिहासावरचे अनेक पुस्तके वाचणे, ऐतिहासिक गोष्टीचे बारीक निरिक्षण करुन त्याच्या प्रतिकृती तयार करुन पाहणे अशा गोष्टी मी छंद म्हणून जोपासू लागलो.
त्यातून मग त्यांनी दोन महिन्यांपूर्वी दोन फूट लांबीच्या तोफांची निर्मिती केली होती. 
मग काही मित्रांनी लहान तोफ बनवता येईल का म्हणून विचारणा केली. त्यातून मग लहान दहा इंच लांबीच्या तोफ बनवल्या. त्याहून लहान तोफांची निर्मिती करण्याचा विचार करून केवळ पाऊण इंच लांबीची आणि विस ग्रॅम वजनाची एक अगदी लहान तोफ बनवली. मग सुरू झाला सर्वात लहान तोफ बनवायचा प्रयत्न. त्यावर विचार करत असताना भारतातील सर्वात लहान तोफ कोणती याची माहिती मिळवली.
त्यातून मग त्यांनी दोन महिन्यांपूर्वी दोन फूट लांबीच्या तोफांची निर्मिती केली होती. मग काही मित्रांनी लहान तोफ बनवता येईल का म्हणून विचारणा केली. त्यातून मग लहान दहा इंच लांबीच्या तोफ बनवल्या. त्याहून लहान तोफांची निर्मिती करण्याचा विचार करून केवळ पाऊण इंच लांबीची आणि विस ग्रॅम वजनाची एक अगदी लहान तोफ बनवली. मग सुरू झाला सर्वात लहान तोफ बनवायचा प्रयत्न. त्यावर विचार करत असताना भारतातील सर्वात लहान तोफ कोणती याची माहिती मिळवली.
राजस्थानमध्ये जयपूर येथील कुंजबिहारी सोनी यांनी  1971मध्ये साली भारतातील सर्वात लहान तोफ बनवली होती. तिची लांबी 11 मीमी आणि 8 उंची मीमी इतकी आहे आणि वजन 1.2 ग्रॅम आहे. तसेच जगातील सर्वात लहान उडवता येण्यासारखी तोफ हर्ने हल यांनी बनवलेली आहे. ती 6 मिलीमीटर लांब तर 3 मिलीमीटर उंच आहे.
त्याहून लहान तोफ बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सूक्ष्म हत्यारे वापरून तसेच कोणत्याही CNC मशीनचा उपयोग न करता, साधारण लेथ मशीनरीचा वापर करत, एक अतिशय लहान तोफ बनवली. तिची लांबी फक्त 5 मिमी, रुंदी 3.5 मिमी, उंची 2.7 मिमी आहे, तर वजन केवळ 140 मिलिग्रॅम आहे. तोफेचं बॅरल केवळ 0.96 मिलीमीटर व्यासाचे आहे. ती उडवता येऊ शकेल अशी रचना केलेली आहे.त्यांनी यासाठी पितळ तसेच तांबे हे धातू वापरले.
राजस्थानमध्ये जयपूर येथील कुंजबिहारी सोनी यांनी 1971मध्ये साली भारतातील सर्वात लहान तोफ बनवली होती. तिची लांबी 11 मीमी आणि 8 उंची मीमी इतकी आहे आणि वजन 1.2 ग्रॅम आहे. तसेच जगातील सर्वात लहान उडवता येण्यासारखी तोफ हर्ने हल यांनी बनवलेली आहे. ती 6 मिलीमीटर लांब तर 3 मिलीमीटर उंच आहे. त्याहून लहान तोफ बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सूक्ष्म हत्यारे वापरून तसेच कोणत्याही CNC मशीनचा उपयोग न करता, साधारण लेथ मशीनरीचा वापर करत, एक अतिशय लहान तोफ बनवली. तिची लांबी फक्त 5 मिमी, रुंदी 3.5 मिमी, उंची 2.7 मिमी आहे, तर वजन केवळ 140 मिलिग्रॅम आहे. तोफेचं बॅरल केवळ 0.96 मिलीमीटर व्यासाचे आहे. ती उडवता येऊ शकेल अशी रचना केलेली आहे.त्यांनी यासाठी पितळ तसेच तांबे हे धातू वापरले.
पुढे विठ्ठल सांगतात, माणसाने जर आपल्या  दैनंदिन कामासोबत छंदाचीही जोपासना केली तर आनंदी राहता येते. 
तोफांसोबतच अनेक लहान लहान वस्तूंची निर्मिती विठ्ठल गोरे यांनी केलेली आहे. त्यात कट्यार, वाघनखे, जातं, तसेच शेतीची औजारे यांचीही निर्मिती त्यांनी केलेली आहे. आतापर्यंत त्यांनी 10 ते 12 तोफा विकल्या आहेत.पण ते विश्वासातील लोकांनाच तोफा बनवून देतात. यात विठ्ठल गोरे सांगतात मी तोफा देताना ज्याला तोफ द्यायची  आहे त्याच्याकडून एक हमीपत्र लिहून घेतो. त्यात स्पष्टपणे लिहलेलं असतं की आम्ही तोफेचा गैरवापर किंवा तोफ या ऐतिहासिक गोष्टीचा अपमान होईल अशी कृत्य करणार नाही.
पुढे विठ्ठल सांगतात, माणसाने जर आपल्या दैनंदिन कामासोबत छंदाचीही जोपासना केली तर आनंदी राहता येते. तोफांसोबतच अनेक लहान लहान वस्तूंची निर्मिती विठ्ठल गोरे यांनी केलेली आहे. त्यात कट्यार, वाघनखे, जातं, तसेच शेतीची औजारे यांचीही निर्मिती त्यांनी केलेली आहे. आतापर्यंत त्यांनी 10 ते 12 तोफा विकल्या आहेत.पण ते विश्वासातील लोकांनाच तोफा बनवून देतात. यात विठ्ठल गोरे सांगतात मी तोफा देताना ज्याला तोफ द्यायची आहे त्याच्याकडून एक हमीपत्र लिहून घेतो. त्यात स्पष्टपणे लिहलेलं असतं की आम्ही तोफेचा गैरवापर किंवा तोफ या ऐतिहासिक गोष्टीचा अपमान होईल अशी कृत्य करणार नाही.
पुढे विठ्ठल सांगतात की,  मी इतिहासाचा अभ्यास करताना मला मूळ जुने पत्र वाचायची आवड होती, पण जुने सगळी दस्तऐवज मोडी लिपीत असल्यामुळे मग मी मोडी लिपी शिकायचा विडा उचलला आणि अगदी शून्यातून सुरुवात करत हळूहळू मोडी लिपीचा अभ्यास करु लागलो. मग मी मोडी आणि ब्राम्ही लिपी दोन्ही शिकलो. त्याचा असा फायदा झाला की मी गडकिल्ल्यांवर गेलो की मला तेथील शिळावर लिहलेलं वाचता येऊ लागलं. अनेक संदर्भ जुळत गेले. आता मी मोडीलिपी आणि ब्राम्ही लिपीचा अभ्यास तर करतोच पण नवीन पिढीला प्रशिक्षणसुद्धा देतो.

मोडीतली अक्षरांची वळणे गोलाकार असतात, त्यामध्ये देवनागरीच्या विपरीत, काना खालून वर जातो. यामुळे पुढचे अक्षर चटकन लिहिता येते. तसेच प्रत्येक अक्षराची सुरुवात आणि शेवट डोक्यावरच्या रेषेवर होते. 
पुढे विठ्ठल सांगतात, शिलालेखाचा अभ्यास करताना सम्राट अशोकाच्या काळातील बहुतांश शिलालेख ब्राह्मी लिपीत आढळतात.
विठ्ठल गोरे यांनी भटकंतीवर बरंच लेखनही केलेलं आहे. काही वृत्तपत्रांमधून प्रकाशित पण झालं आहे.
विठ्ठल गोरे यांनी हिमालयातही पाच सहा मोहिमा केलेल्या आहेत. सरत्या शेवटी ते सांगतात आवड असली की कामातून आपोआप सवड निघते.
मोडीतली अक्षरांची वळणे गोलाकार असतात, त्यामध्ये देवनागरीच्या विपरीत, काना खालून वर जातो. यामुळे पुढचे अक्षर चटकन लिहिता येते. तसेच प्रत्येक अक्षराची सुरुवात आणि शेवट डोक्यावरच्या रेषेवर होते. पुढे विठ्ठल सांगतात, शिलालेखाचा अभ्यास करताना सम्राट अशोकाच्या काळातील बहुतांश शिलालेख ब्राह्मी लिपीत आढळतात. विठ्ठल गोरे यांनी भटकंतीवर बरंच लेखनही केलेलं आहे. काही वृत्तपत्रांमधून प्रकाशित पण झालं आहे. विठ्ठल गोरे यांनी हिमालयातही पाच सहा मोहिमा केलेल्या आहेत. सरत्या शेवटी ते सांगतात आवड असली की कामातून आपोआप सवड निघते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com