- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- निवडणूक
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
Photo : पोटभर खा हे ५ पदार्थ! वजन वाढणार नाही, कमी होईल


वजन कमी करण्यासाठी तुम्हाला डायटिंग नव्हे योग्य डाएटची आवश्यकता असते अशा डाएटची जे तुम्ही दिर्खकाळ फॉलो करू शकता. बहूतेक लोक वजन कमी करण्यासाठी डायटिंगचा आधार घेतात आणि क्रश डायटिंग करतात. त्यामुळे काही दिवसांमध्ये तुमचे डायटिंग संपल्यानंतर शरीरामध्ये अशक्तपणा जाणवतो.

आम्ही तुम्हाला खाण्या-पिण्याच्या अशा पदार्थांबाबत सांगत आहोत, त्यामुळे तुम्ही झपाट्याने वजन कमी करू शकता. कोणतीही अवघड कसरत न करता तुम्ही वजन कमी करू शकता. हे ५ पदार्थपोटभर खाल्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही आणि वज कमी करण्यासाठी मदत होईल.

दही- उन्हाळ्यात दही शरीराला पोषण देते आणि वजन कमी करण्यासही मदत करते. दही खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते आणि तुम्ही जास्त खाणे (Over Eating) देखील टाळता. दह्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन बी12 आणि मॅग्नेशियम असते. दही खाल्ल्याने पोट हलके होते.

भोपळा - उन्हाळ्यामध्ये खाल्या जाणाऱ्या हिरव्या भाज्या जसे की भोपळा आणि दोडका वजन कमी करण्यासाठी मदत करतात. भोपळा खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. भोपळा खाल्यामुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक मिळते.

ताक- वजन कमी करायचे असेल तर जेवणात ताक जरूर वापरावे. ताकामध्ये हेल्दी बॅक्टेरिया, कार्बोहायड्रेट्स आणि लॅक्टोज असतात जे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. फिगर मेन्टेंन करण्यासाठी तुम्ही साधे किंवा मसाला ताक जेवणासोबत पिऊ शकता.

लिंबू- उन्हाळ्यात लिंबाचा वापर जास्त करावा. उष्णतेपासून वाचण्यासाठी दररोज लिंबू पाणी प्यावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि वजनही कमी होते. लिंबूमध्ये थायमिन, नियासिन, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी-6 आणि फोलेट सारखी जीवनसत्त्वे असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.

बदाम- बदामामध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे भूक लागत नाही. बदाम खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते. त्यामुळे अतिरिक्त चरबी लवकर कमी होते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, फायबर, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, ओमेगा ६ फॅटी अॅसिड आणि प्रोटीन असते. मात्र उन्हाळ्यात तुम्ही भिजवलेले बदाम खावेत.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.