Women's Day : झाशीच्या राणीचा वारसा चालवणाऱ्या मैदानावरील 7 सुपर मॉम

Womens Day Special 7 Indian Sports Women
Womens Day Special 7 Indian Sports Women esakal
Updated on

नुकताच पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिसमाह मारूफचा एक फोटो व्हायरल झाला होता. ती आपल्या सहा महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन मैदानात उतरली होती. मुलीला जन्म दिल्यानंतर फक्त सहा महिन्यात ती देशाकडून खेळण्यासाठी सज्ज झाली होती. भारतातही अशा अनेक सुपर मॉम (India Super Mom) आहेत ज्यांनी मुलाला जन्म दिल्यानंतरही मैदान गाजवले. भारताला झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा इतिहास आहे. लहान मुलाला पाठीशी बांधून इंग्रजांशी झुंजलेल्या या राणीचा वारसा आजही भारतीय महिला पुढे चालवत आहे. आज महिला दिनी (International Women's Day) आपण अशाच भारतातील 7 महिला खेळाडू पाहणार आहोत ज्यांनी मुलाला जन्म दिल्यानंतरही आपले ध्येय आणि खेळातील कारकिर्द यशस्वीरित्या पुढे सुरू ठेवली.

अनिता पौलधुरई  (Anitha Pauldhurai)

अनिता ही भारताची अव्वल बास्केटबॉल खेळाडू आहे. याचबरोबर ती सलग 9 वेळा आशियाई बास्केटबॉल कॉन्फिडरेशन चॅम्पियनशिप खेळणारी पहिली आणि एकमेव भारतीय खेळाडू आहे. तिने नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये रेकॉर्ड ब्रेक 30 मेडल जिंकली आहेत. तामिळनाडूची स्टार बास्केटबॉल प्लेअरची थायलंडमधील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लीग स्पर्धेसाठी देखील निवड झाली होती. त्यानंतर ती गर्भवती राहिल्याने तिला बास्केटबॉल पासून दूर जावे लागले. मात्र तिने बाळाला जन्म दिल्यानंतर प्रत्येक दिवशी 1 तास व्यायाम करू लागली. त्यानंतर तिने बास्केटबॉल कोर्टवर पुनरागमन केले.
अनिता पौलधुरई (Anitha Pauldhurai) अनिता ही भारताची अव्वल बास्केटबॉल खेळाडू आहे. याचबरोबर ती सलग 9 वेळा आशियाई बास्केटबॉल कॉन्फिडरेशन चॅम्पियनशिप खेळणारी पहिली आणि एकमेव भारतीय खेळाडू आहे. तिने नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये रेकॉर्ड ब्रेक 30 मेडल जिंकली आहेत. तामिळनाडूची स्टार बास्केटबॉल प्लेअरची थायलंडमधील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लीग स्पर्धेसाठी देखील निवड झाली होती. त्यानंतर ती गर्भवती राहिल्याने तिला बास्केटबॉल पासून दूर जावे लागले. मात्र तिने बाळाला जन्म दिल्यानंतर प्रत्येक दिवशी 1 तास व्यायाम करू लागली. त्यानंतर तिने बास्केटबॉल कोर्टवर पुनरागमन केले. Sakal
सानिया मिर्झा (Sania Mirza)

सानिया मिर्झा देखील भारतीय महिलांसाठी एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न करण्यापूर्वी ती भारताची एक स्टार टेनिसपटू होती. तिचे नाव भारताच्या आघाडीच्या खेळाडूंबरोबर घेतले जायचे. सानिया मिर्झाला देखील बाळंतपणात ब्रेक घ्यावा लागला होता. मात्र त्यानंतर तिने मेहनत घेऊन टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. ती देखील आपल्या मुलाला सामन्यादरम्यान टेनिस कोर्टवर घेऊन जात होती. सानिया मिर्झाने सहा ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. तिने सिंगल्स बरोबरच डबल आणि मिक्स डबल्समध्ये देखील दमदार कामगिरी केली आहे. सानिया मिर्झाने आपल्या टेनिस कारकिर्दित 1 मिलियन युएस डॉलर कमवण्याचा टप्पा पार केला आहे. ती तरूणींसाठी एक रोल मॉडेल आहे.
सानिया मिर्झा (Sania Mirza) सानिया मिर्झा देखील भारतीय महिलांसाठी एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न करण्यापूर्वी ती भारताची एक स्टार टेनिसपटू होती. तिचे नाव भारताच्या आघाडीच्या खेळाडूंबरोबर घेतले जायचे. सानिया मिर्झाला देखील बाळंतपणात ब्रेक घ्यावा लागला होता. मात्र त्यानंतर तिने मेहनत घेऊन टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. ती देखील आपल्या मुलाला सामन्यादरम्यान टेनिस कोर्टवर घेऊन जात होती. सानिया मिर्झाने सहा ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. तिने सिंगल्स बरोबरच डबल आणि मिक्स डबल्समध्ये देखील दमदार कामगिरी केली आहे. सानिया मिर्झाने आपल्या टेनिस कारकिर्दित 1 मिलियन युएस डॉलर कमवण्याचा टप्पा पार केला आहे. ती तरूणींसाठी एक रोल मॉडेल आहे. Sakal
कोनेरू हम्पी (Koneru Humpy)

ग्रँड मास्टर कोनेरू हम्पीने 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले होते. ती 2600 एलो रेटिंग मार्क पार करणारी ज्युडीट पोलगर नंतरची दुसरीच महिला ठरली होती. हम्पी सर्वात कमी वयाची ग्रँड मास्टर ठरली होती. त्यानंतर तिचे हे रेकॉर्ड हाऊ यिफानने मोडले होते.  हम्पीने 2016 ते 2018 मध्ये बाळंतपणासाठी ब्रेक घ्यावा लागला होता. आता ती पुन्हा बुद्धीबळाच्या पटलावर आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.
कोनेरू हम्पी (Koneru Humpy) ग्रँड मास्टर कोनेरू हम्पीने 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले होते. ती 2600 एलो रेटिंग मार्क पार करणारी ज्युडीट पोलगर नंतरची दुसरीच महिला ठरली होती. हम्पी सर्वात कमी वयाची ग्रँड मास्टर ठरली होती. त्यानंतर तिचे हे रेकॉर्ड हाऊ यिफानने मोडले होते. हम्पीने 2016 ते 2018 मध्ये बाळंतपणासाठी ब्रेक घ्यावा लागला होता. आता ती पुन्हा बुद्धीबळाच्या पटलावर आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. Sakal
सरिता देवी (Sarita Devi)

सरिता देवीने आपल्या बॉक्सिंग कारकिर्दित आतापर्यंत अनेक पदके जिंकली आहे. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या लाईट वेट प्रकारात 2006 ला सुवर्ण पदक जिंकले होते. या भारताच्या सुपर मॉमने 2014 ला आशियाई गेम्समध्ये कांस्य आणि त्याच वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकाची देखील कमाई केली होती.
सरिता देवी (Sarita Devi) सरिता देवीने आपल्या बॉक्सिंग कारकिर्दित आतापर्यंत अनेक पदके जिंकली आहे. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या लाईट वेट प्रकारात 2006 ला सुवर्ण पदक जिंकले होते. या भारताच्या सुपर मॉमने 2014 ला आशियाई गेम्समध्ये कांस्य आणि त्याच वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकाची देखील कमाई केली होती. Sakal
सहाना कुमारी (Sahana Kumari)

उंच उडी प्रकारात 
भारताकडून खेळणाऱ्या सहाना कुमारीने 1.92 मीटर उंचउडी मारत राष्ट्रीय विक्रम प्रस्तापित केला होता. ती 2012 च्या आलिम्पिक गेम्समध्ये देखील पात्र ठरली होती. तिने त्यावेळी अंजू बॉबी जॉर्जचे 1.92 मीटरचे रेकॉर्ड मोडले होते. जरी ती लंडन ऑलिम्पिकमध्ये पहिल्या फेरीतच बाहेर पडली असली तरी एका मुलीची आई असलेली सहाना देवीने उंच उडी सारख्या ताकदीच्या खेळात मिळवलेले प्राविण्य वाखाण्याजोगे आहे.
सहाना कुमारी (Sahana Kumari) उंच उडी प्रकारात भारताकडून खेळणाऱ्या सहाना कुमारीने 1.92 मीटर उंचउडी मारत राष्ट्रीय विक्रम प्रस्तापित केला होता. ती 2012 च्या आलिम्पिक गेम्समध्ये देखील पात्र ठरली होती. तिने त्यावेळी अंजू बॉबी जॉर्जचे 1.92 मीटरचे रेकॉर्ड मोडले होते. जरी ती लंडन ऑलिम्पिकमध्ये पहिल्या फेरीतच बाहेर पडली असली तरी एका मुलीची आई असलेली सहाना देवीने उंच उडी सारख्या ताकदीच्या खेळात मिळवलेले प्राविण्य वाखाण्याजोगे आहे. Sakal
मेरी कोम (Mary Kom)

मणिपूर मेरी कोमला कोण ओळखत नाही. बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप रेकॉर्ड ब्रेक सहा वेळा जिंकणारी ती एकमेव खेळाडू आहे. तिने मिळवलेल्या मेडल्सची गणतीच खूप मोठी आहे. मात्र तिलाही दोन वेळा बाळंतपणासाठी बॉक्सिंग रिंगपासून दूर जावे लागले होते. तिने 2007 ला जुळ्यांना जन्म दिला. त्यानंतर तिने 2013 ला आपल्या तिसऱ्या बाळाला देखील जन्म दिला होता. यानंतरही तिने बॅक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन करून त्याच जोशाने आपली कारकिर्द फुलवली. मेरी कोम सध्या भारतीय क्रीडा वर्तुळातील एक आदर्श व्यक्तीमत्व आहे.
मेरी कोम (Mary Kom) मणिपूर मेरी कोमला कोण ओळखत नाही. बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप रेकॉर्ड ब्रेक सहा वेळा जिंकणारी ती एकमेव खेळाडू आहे. तिने मिळवलेल्या मेडल्सची गणतीच खूप मोठी आहे. मात्र तिलाही दोन वेळा बाळंतपणासाठी बॉक्सिंग रिंगपासून दूर जावे लागले होते. तिने 2007 ला जुळ्यांना जन्म दिला. त्यानंतर तिने 2013 ला आपल्या तिसऱ्या बाळाला देखील जन्म दिला होता. यानंतरही तिने बॅक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन करून त्याच जोशाने आपली कारकिर्द फुलवली. मेरी कोम सध्या भारतीय क्रीडा वर्तुळातील एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. Sakal
कृष्णा पुनिया (Krishna Poonia)

तीनवेळा ऑलिम्पिक पात्रता फेरी पार करणारी आणि आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेती थाळी फेकपटू कृष्णा पुनियाने 2010 ची राष्ट्रकुल स्पर्धा गाजवली होती. तिने 2006 आणि 2010 ला आशियाई गेम्समध्ये कांस्य पदक जिंकले होते. सध्याची 64.76 मीटर थाळी फेकून राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर करणारी कृष्णा पुनियाने 2001 मध्ये मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर तिने पुनरागमन करत मोठेमोठ्या स्पर्धांमध्ये मेडल मिळवत भारताचे नाव उंचावले होते.
कृष्णा पुनिया (Krishna Poonia) तीनवेळा ऑलिम्पिक पात्रता फेरी पार करणारी आणि आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेती थाळी फेकपटू कृष्णा पुनियाने 2010 ची राष्ट्रकुल स्पर्धा गाजवली होती. तिने 2006 आणि 2010 ला आशियाई गेम्समध्ये कांस्य पदक जिंकले होते. सध्याची 64.76 मीटर थाळी फेकून राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर करणारी कृष्णा पुनियाने 2001 मध्ये मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर तिने पुनरागमन करत मोठेमोठ्या स्पर्धांमध्ये मेडल मिळवत भारताचे नाव उंचावले होते. Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com