Burj Khalifa : जबरदस्त! उंची 828 मीटर अन् मजले 168; या गगनचुंबी इमारतीचं नाव बुर्ज खलिफा का ठेवलं ?
Burj Khalifa : बुर्ज खलिफा हे नाव प्रत्येकानेच ऐकलंय. यावर बॉलीवूडची गाणीसुद्धा आहेत. त्याची शिगेला पोहोचलेली उंची अन् लक्झरी इमारत हे या इमारतीचं खास वैशिष्ट्य आहे. अख्ख्या जगात या इमारतीचा बोलबाला आहे. मात्र या इमारतीमागचा रंजक इतिहास तुम्हाला माहिती आहे काय? या इमारतीला बूर्ज खलिफाच नाव का पडले ते आपण जाणून घेणार आहोत. (Dubai Building Burj Khalifa)
दुबईत गेलेला प्रत्येक व्यक्ती या इमारतीपुढे फोटो काढण्यास इच्छुक असतो
दुबईच्या या इमारतीला बुर्ज खलिफाच नाव का पडले ? बुर्ज खलिफा ही इमारत उभारायला अरबो मिलीयन डॉलरची रक्कम खर्च केल्या गेली. या इमारतीत मॉल्स, स्विमिंग पूल आणि बऱ्याच लक्झरी सुविधा आहेत. मात्र जेव्हा या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली तेव्हा पैसे कमी पडलेत. संयुक्त अरब अमिरातीचे शासक 'शेख खलिफा' यांनी आर्थिक मदत आणि निधी मंजूर केला, तेव्हा या भव्य इमारतीचे काम पूर्ण होऊ शकले. म्हणून या इमारतीचे नाव बदलून "बुर्ज खलिफा" असे ठेवण्यात आले.
या भव्य इमारतीला बांधण्यासाठी तब्बल आठ अरब डॉलरचा खर्च आला. १२८ मीटर उंची आणि १६८ मजलीची ही इमारत असून अगदी ९६ किलोमीटर दूरूनदेखील सहज दिसते.
यात लावण्यात आलेली लिफ्ट ही जगातील सगळ्यात वेगवान लिफ्ट आहे. या इमारतीपुढे उभे राहून फोटो काढणे हे अनेकांचं ड्रिम असतं. तसेच अनेक सेलिब्रिटींचे या इमारतीपुढील फोटो तुम्हाला दिसून येतील.
या इमारतीचा १२४ वा मजला ५ जानेवारी २०१० रोजी उघडण्यात आला. ही इमारत जगातील तिसरा सर्वोच्च निरिक्षण डेक आहे आणि जगातील दुसरा सर्वात मोठा बाह्य निरीक्षण डेक आहे.