sakal

बोलून बातमी शोधा

WPL 2023 Auction : या पाच विदेशी महिला क्रिकेटपटू होऊ शकतात कोट्याधीश; ऑस्ट्रेलियाचा राहणार दबदबा?

WPL 2023 Auction

WPL 2023 Auction : वुमन प्रीमियर लीग 2023 च्या पहिल्या हंगामासाठी आज मेगा लिलाव होत आहे. या लिलावात 50 लाख ही सर्वोच्च बेस प्राईस आहे. प्रत्येक संघाला 12 कोटी रूपये खर्च करण्याची मुबा असेल. तसेच किमान 15 आणि कमाल 18 खेळाडू संघात घ्यावे लागणार आहेत. त्यातील 6 खेळाडू हे विदेशी असतील. यंदाच्या लिलावावर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा वरचश्मा राहण्याची शक्यता आहे. विदेशी खेळाडूंधील काही निवड स्टार खेळाडू आहेत ज्यांचावर फ्रेंचायजी कोट्यावधी रूपयांची उधळण करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत.

एलिस पेरी :
ऑस्ट्रेलियाची स्टार क्रिकेटपटू एलिस पेरी एक लेजंड महिला क्रिकेटपटू आहे. तिने आतापर्यंत 134 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले असून 1515 धावा ठोकल्या आहेत. तसेच वेगवान गोलंदाजी करण्यात निष्णात असलेल्या पेरीने 120 विकेट्स देखील घेतल्या आहेत. तिच्यासाठीही फ्रेंचायजी आपली पर्स ढिली करणार हे नक्की.

एलिस पेरी : ऑस्ट्रेलियाची स्टार क्रिकेटपटू एलिस पेरी एक लेजंड महिला क्रिकेटपटू आहे. तिने आतापर्यंत 134 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले असून 1515 धावा ठोकल्या आहेत. तसेच वेगवान गोलंदाजी करण्यात निष्णात असलेल्या पेरीने 120 विकेट्स देखील घेतल्या आहेत. तिच्यासाठीही फ्रेंचायजी आपली पर्स ढिली करणार हे नक्की.

मेग लॅनिंग :
ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग महिला क्रिकेट इतिहासातील एक अव्वल दर्जाची फलंदाज म्हणून ओळखली जाते. तिने 127 टी 20 सामन्यात 3297 धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचाही समावेश आहे. मेग कोणत्याही संघात गेली तरी तिचे कर्णधारपद पक्के असते. 30 वर्षाची ही खेळाडू देखील कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊ शकते.

मेग लॅनिंग : ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग महिला क्रिकेट इतिहासातील एक अव्वल दर्जाची फलंदाज म्हणून ओळखली जाते. तिने 127 टी 20 सामन्यात 3297 धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचाही समावेश आहे. मेग कोणत्याही संघात गेली तरी तिचे कर्णधारपद पक्के असते. 30 वर्षाची ही खेळाडू देखील कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊ शकते.

अमेलिया केर :
न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटूने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ माजवली आहे. तिने 56 सामन्यात 565 धावा केल्या असून 55 विकेट्स देखील आपल्या नावावर केल्या आहेत. ती मधल्या फळीत फलंदाजी करते. याशिवाय ती लेग स्पिन टाकते. त्यामुळे भारतीय खेळपट्ट्यांवर तिची डिमांड चांगलीच असणार आहे. विशेष म्हणजे ती फक्त 22 वर्षाची आहे. त्यामुळे लंबी रेस का घोडा आहे.

अमेलिया केर : न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटूने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ माजवली आहे. तिने 56 सामन्यात 565 धावा केल्या असून 55 विकेट्स देखील आपल्या नावावर केल्या आहेत. ती मधल्या फळीत फलंदाजी करते. याशिवाय ती लेग स्पिन टाकते. त्यामुळे भारतीय खेळपट्ट्यांवर तिची डिमांड चांगलीच असणार आहे. विशेष म्हणजे ती फक्त 22 वर्षाची आहे. त्यामुळे लंबी रेस का घोडा आहे.

नताली सीवर ब्रंट :
इंग्लंडची नताली गोलंदाजी आणि फलंदाजी करण्यात माहीर आहे. तिने 104 टी 20 सामन्यात 1999 धावा केल्या आहेत. तसेच 78 विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. प्रत्येक संघ मालकाला नताली आपल्या संघात हवी असे वाटणे सहाजिकच आहे. त्यामुळे तिला आपल्या गोटात खेचण्यासाठी स्पर्धा लागणार

नताली सीवर ब्रंट : इंग्लंडची नताली गोलंदाजी आणि फलंदाजी करण्यात माहीर आहे. तिने 104 टी 20 सामन्यात 1999 धावा केल्या आहेत. तसेच 78 विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. प्रत्येक संघ मालकाला नताली आपल्या संघात हवी असे वाटणे सहाजिकच आहे. त्यामुळे तिला आपल्या गोटात खेचण्यासाठी स्पर्धा लागणार

तहलिया मॅक्ग्रा :
ऑस्ट्रेलियाची तहलिया मॅक्ग्रा महिला क्रिकेट जगतातील एक अव्वल अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखली जाते. तिने आतापर्यंत फक्त 22 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. त्यात तिने 140 च्या स्ट्राईक रेट आणि 61.89 च्या सरासरीने 557 धाा केल्या आहेत. याचबरोबर 13 विकेट्स घेतल्या आहेत. तीन वेगान गोलंदाजी करते. सध्या ती टी 20 मधील जगातील क्रमांक 1 ची फलंदाज आहे.

तहलिया मॅक्ग्रा : ऑस्ट्रेलियाची तहलिया मॅक्ग्रा महिला क्रिकेट जगतातील एक अव्वल अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखली जाते. तिने आतापर्यंत फक्त 22 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. त्यात तिने 140 च्या स्ट्राईक रेट आणि 61.89 च्या सरासरीने 557 धाा केल्या आहेत. याचबरोबर 13 विकेट्स घेतल्या आहेत. तीन वेगान गोलंदाजी करते. सध्या ती टी 20 मधील जगातील क्रमांक 1 ची फलंदाज आहे.