Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात खतांचा 1 लाख 22 हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध

fertilizers
fertilizersesakal

Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात सध्या खतांचा १ लाख‌ २२ हजार ८७२ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. मुख्य खत युरियाचा २२ हजार १३२ मेट्रिक टन साठा आहे.

पुढील आठवड्यात इफ्को व कृभको कंपनीचा ५२०० मेट्रिक टन युरीया खताचा पुरवठा होणार आहे. खतांचा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. (1 lakh 22 thousand metric tons stock of fertilizers available in district jalgaon news)

यामुळे शेतकऱ्यांनी खते भरुन न ठेवता, जसे लागतील तसे खतांची खरेदी करावी. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. संभाजी ठाकूर व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सुरज जगताप यांनी केले आहे.

जिल्हा नियोजन बैठकीत युरिया खतांच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित झाला होता. यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लवकरच खत उपलब्धतेचा आढावा घेऊन युरिया खताचे पुनर्वितरण करण्याच्या सूचना कृषी विभाग व जिल्हा परिषद विभागास दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील खतांचे पुनर्वितरण करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

fertilizers
Nashik Agriculture News : जिल्ह्यात 3 हजार एकर क्षेत्र बनले सुपीक; बंधाऱ्यांच्या साठवण क्षमतेतही मोठी वाढ

एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत आवश्यकतेप्रमाणे दरमहा पुरवठा करण्यात येत असतो. जिल्ह्यात आजरोजी २ लाख ४३ हजार १०३ मे. टन खतांचा पुरवठा करण्यात आलेला असुन, मुख्य खत युरियाचा ७६ हजार ६९९ मे. टन पुरवठा झालेला आहे.

२२ ऑगस्टला आरसीएफ कंपनीमार्फत ३००० मे. टन व एनएफएल कंपनीचा २६०० मे. टन युरिया पुरवठा करण्यात आलेला असून, पुढील आठवड्यात इफ्को कंपनीचा २६०० मे. टन युरीया खताचा व कृभको कंपनीचा २६०० मे. टन युरिया खतांच्या पुरवठा होणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी खत भरुन न ठेवता, जसे लागतील तसे खतांची खरेदी करावी. युरीया, एसएसपी व पोटॅश या मुलभूत खतांचा वापर करुनदेखील घरच्या घरी मिश्र खते बनवता येतील. बियाणे व खत खरेदी करताना जिल्ह्यातील अधिकृत वितरकांकडूनच खरेदी करावे. विक्रेत्यांकडून बील अवश्य घ्यावे, असे आवाहनही श्री. ठाकूर यांनी केले आहे.

fertilizers
Urea Fertilizer : युरियाच्या अतिवापराने किडनीच्या आजाराचा धोका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com