Jalgaon News : अबब ! जात प्रमाणित करण्यासाठी 10 लाखांची लाच

Bribe News
Bribe Newsesakal

जळगाव : जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी तब्बल १९ वर्षांपासून वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून आणि मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचित जमाती जातपडताळणी समितीला जातवैधता प्रमाणपत्राचा निकाल देण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देऊन तक्रारदाराकडून दहा लाखांची लाचेची मागणी करणाऱ्या कनिष्ठ लिपिक, समिती सदस्यासह मध्यस्थी अशा तीन जणांवर जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली.

फैजपूर येथील तक्रारदारास अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी त्यांनी स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रकरण सादर केले होते.१९ वर्षांपासून वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करूनदेखील तक्रारदारांना त्यांचे स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जातवैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे रिट पीटीशन दाखल केले होते. (10 lakh bribe for taking for prepare caste verification Jalgaon Crime News)

Bribe News
Jalgaon News | नाशिक पदवीधर संघाची 30 जानेवारीस निवडणूक : जिल्हाधिकारी अमन मित्तल

त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचित जमाती जातपडताळणी समितीला सदर दोन्ही जातवैधता प्रमाणपत्राचा निकाल देण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्याबाबत निकाल दिला होता.

न्यायालयाची प्रत जात पडताळणी समिती कार्यालय, धुळे येथे जमा केल्यानंतरही या प्रकरणाचा निकाल न दिल्याने तक्रारदार यांनी अनुसूचित जमाती जातपडताळणी समिती कार्यालयातील कनिष्ठ लिपिक अनिल पाटील (वय ५२, वर्ग ३, रा. शिरपूर), नीलेश अहिरे (५२, समिती सदस्य, अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती कार्यालय, धुळे वर्ग-१ रा.नंदुरबार/नाशिक व राजेश ठाकूर (५२, कनिष्ठ लिपिक, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, नाशिक वर्ग-३) या तिघांनी तक्रारदाराकडे दहा लाखांची मागणी केली.

या संदर्भात तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची खातरजमा केल्यावर जळगावच्या पथकाने कॉल डिटेल आणि तांत्रिक यंत्रणेचा वापर करून केलेल्या चौकशीतून तिघांनी पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचखोर तिघांविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Bribe News
Crime News : मोबाईलवर फिल्म दाखवण्याच्या बहाण्यानं सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आधी टेरेसवर नेलं अन् तिथं..

थर्टी फर्स्टचा उडवला बार...

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवी घुगे, अशोक अहिरे, बाळू मराठे, सुनील वानखेडे, ईश्वर धनगर, प्रणेश ठाकूर आदींनी नियोजनबद्धपणे संपूर्ण पुरावे, दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचे संकलन झाल्यावर तिघा संशयितांवर थर्टी फर्स्टच्या दुपारीच झडप घालून अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Bribe News
Crime News : मोबाईलवर फिल्म दाखवण्याच्या बहाण्यानं सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आधी टेरेसवर नेलं अन् तिथं..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com