Jalgaon Crime News : महिलेवर अत्याचारप्रकरणी 10 वर्षे शिक्षा

10 years sentence for violence against woman accused jalgaon crime news
10 years sentence for violence against woman accused jalgaon crime newsesakal

Jalgaon News : तालुक्यातील म्हसावद येथील घटस्फोटित महिलेस कामाला लावण्याचे आमिष दाखवून तिची लूट व अत्याचार केल्याप्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. पैकी अत्याचार करणाऱ्या आरोपीस दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. (10 years sentence for violence against woman accused jalgaon crime news)

म्हसावद येथील घरस्फोटित महिलेस लताबाई सोनवणे व बुटाबाई चंदनशिवे यांनी कामाला लावण्याचे आमिष दाखवून पीडितेचे कान व गळ्यातली पोत काढून घेत रुदावली (ता. शिरपूर) येथे मनोहर ऊर्फ जिभाऊ आंबरसिंग सोनवणे या विधुराच्या सुपूर्द केले. मनोहर याने पीडितेवर त्याच्या राहत्या घरी रात्री दोनवेळा अत्याचार केला.

ही घटना पीडितेच्या मामास कळाल्यानंतर त्याने लताबाईला विचारपूस केली व तिला म्हसावद पोलिस दूरक्षेत्रात आणले. पोलिसांना लताबाईने पीडितेस रुदावली येथे मनोहर सोनवणेकडे पाठविल्याचे मान्य केले. पोलिस रुदावली येथे पोचल्यावर पीडित महिला मनोहरच्या घरात रडताना आढळली. याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात लताबाईसह बुटाबाई व मनोहर सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

10 years sentence for violence against woman accused jalgaon crime news
Jalgaon Crime : पोलिस कुटुंबीयांकडून विवाहितेचा छळ

अकरा साक्षीदार तपासले

या गुन्ह्याचे आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आले. खटल्याच्या सिद्धतेसाठी सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, तिचे मामा, पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण पाटील, नीता कायटे, डॉ. सूरज जगताप, डॉ. नखाले यांच्या साक्ष झाल्या.

अशी झाली शिक्षा

सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरत न्यायाधीश श्रीमती एस. एन. माने यांनी मनोहर यास १० वर्षांची सश्रम शिक्षा व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास, आरोपी लताबाई व बुटाबाई यांना प्रत्येकी ५ वर्षे शिक्षा व २५ हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावास सुनावला. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अनुराधा वाणी यांनी काम पाहिले.

10 years sentence for violence against woman accused jalgaon crime news
Girish Mahajan : पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : गिरीश महाजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com