परीक्षेनंतर मामाकडे आलेली नववीची मुलगी गरोदर; दोन वेळा अत्याचार

14-year-old girl got pregnant after being abused Jalgaon crime News
14-year-old girl got pregnant after being abused Jalgaon crime News file photo

जळगाव : शहरात मामाकडे आलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर संशयिताने संधी साधून दोन वेळेस तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारातून गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी (ता. २२) रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेची सुटी असल्याने १५ ते ३० नोव्हेबर २०२१ दरम्यान जळगाव शहरातील मामाकडे आली होती. याच वेळेस अहमदाबाद (रा. गुजरात) येथील एक अल्पवयीन मुलाने मुलीशी जवळीक साधून तिच्यावर दोनवेळा अत्याचार केला. यामुळे ती गर्भवती राहिली. पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने आई-वडिलांनी जवळच्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी त्यांना जळगावचा रस्ता दाखविला. त्यांनी मंगळवारी सकाळी पीडितेला घेऊन जळगाव गाठले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीअंती ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. मुलगी गर्भवती असल्याचे कळताच आई-वडील धास्तावून गेले. पीडित मुलीला नातेवाईक, कुटुंबीयांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आपल्यावर संशयिताने दोन वेळा अत्याचार केल्याचे सांगितले. पीडितेसह पालकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून संशयिताविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे तपास करीत आहेत.

शाळेची सर्कस पडली महागात

आपली मुलगी हुशार आहे. तिचे शहरात शिक्षण व्हायला पाहिजे, या हट्टापोटी हातमजुरी करणाऱ्या पित्याने तिला शहरात शिक्षणाला घातले. शाळेच्या वेळेत लवकर उठून दुचाकीने मुलीला शाळेत सोडून तिचे वडील कामावर निघून जातं. दुपारी शाळा सुटली, की मुलगी मामाच्या घरी मेहरुण परिसरातच थांबत होती. सायंकाळी तिचे वडील सोबत तिला घरी घेऊन जात होते. फावल्या वेळात ती शाळेचा अभ्यास करीत होती.

14-year-old girl got pregnant after being abused Jalgaon crime News
जळगाव : एरंडोलजवळ कारचा भीषण अपघात, चार जागीच ठार, एक गंभीर

पेपर अन्‌ गिधाडाची झडप

पीडित मुलीच्या मामाकडे अहमदाबाद येथील नात्यातील मुलगा पाहुणा म्हणून आला होता. आजी व मामी बाजारात गेले होते. मामाची मुलगी घरात वरच्या मजल्यावर खेळत असल्याने पीडिता तिच्यासोबत खेळण्यात व्यस्त झाली. थोड्या वेळाने तिची लहान मैत्रीण बाहेर खेळाला गेली. खोलीत एकटी गाठून संशयिताने तिच्यावर अत्याचार केला. असाच प्रकार त्याने पुन्हा दोन दिवसांनी केल्याचे पीडितेने बालकल्याण समितीला सांगितले.

14-year-old girl got pregnant after being abused Jalgaon crime News
काही दिवसांत महाविकास आघाडीबाबत करणार नवा खुलासा; फडणवीसांचा इशारा

पेाटदुखीतून फुटले बिंग

पीडितेचे पोट किंचित मोठे झाले व ते सतत दुखत असल्याने पालकांनी दवाखान्यात नेले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्‍हा सामान्य रुग्णालयात तपासणीअंती ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने डॉक्टरांनी तत्काळ बालकल्याण समिती आणि पोलिसांना कल्पना दिली. बाल न्यायमंडळासह आई-वडिलांनी विश्वासात घेत तिला विचारणा केल्यावर संशयिताने अत्याचार केल्याचे तिने सांगितले.

14-year-old girl got pregnant after being abused Jalgaon crime News
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा विचार करताय? काय आहेत बेस्ट ऑप्शन, वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com