Banana crop in the field. Maize uprooted in the field due to the storm.
Banana crop in the field. Maize uprooted in the field due to the storm.

Jalgaon Unseasonal Rain: भडगावातील 154 हेक्टवरील पीक जमीनदोस्त; अवकाळीसह गारपिटीचा फटका

Jalgaon Unseasonal Rain : दुष्काळाने शेतकरी होरपळला गेलेला असतानाच वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट पडल्याने थोड्या फार प्रमाणावर उभे असलेले पीक जमीनदोस्त झाले. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अश्रूंचा जणू बांध फुटला आहे. तालुक्यातील २९ गावांमधील सुमारे १५४ हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

खरिपात पावसाने पाठ दाखविल्याने उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. विहिरींनी तळ गाठल्याने रब्बीच्या आशाही मावळल्या. त्यात गिरणा काठावरील काही शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून लागवड केलेले पीक अवकाळीने जमीनदोस्त केल्याचे विदारक चित्र मन हेलावून टाकणारे आहे. (154 hectares of crop destroyed in Bhadgaon jalgaon unseasonal rain news)

तालुक्यात रविवारी (ता.२६) सायंकाळी सहाच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने पिके भुईसपाट झाली. भडगाव तालुक्यातील २९ गावातील १५४ हेक्टरवरील ज्वारी, मका, हरभरा, केळीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

लिंबूचा मोहर गळाला

शिवणी, गुढेसह इतरही काही गावांमध्ये गारपिटीने लिंबूंना आलेला बहार गळून पडला. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचे यावर्षीचे उत्पादन अक्षरशः मातीत गेले आहे. कृषी विभाग या नुकसानीचे पंचनामा करायला तयार नाही.

‘लिंबूंची झाडे उन्मळून पडली तरच पंचनामे करता येतील’, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. गारपिटीने बहार पूर्णतः गळून पडलेला दिसत असतानाही पंचनामे का नाही? असा प्रश्न शिवणीचे लिंबू उत्पादक शेतकरी प्रवीणसिंग पाटील यांनी उपस्थित केला आहे.

मेंढ्यांवर वीज कोसळली

वडजी (ता.भडगाव) येथील सहादू कुंभार यांच्या शेतात बसलेल्या मेंढ्यांवर रविवारी (ता.२६) रात्री वीज कोसळली. त्यात दहा मेंढ्या मृत पावल्या. सोमवारी (ता. २७) तहसीलदार मुकेश हिवाळे, तालुका कृषी अधिकारी बागले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल चांदेकर, तलाठी विलास शिंदे, कृषी सहायक आर. बी. राठोड यांनी भेट दिल्या.

Banana crop in the field. Maize uprooted in the field due to the storm.
Jalgaon Unseasonal Rain: अवकाळीमुळे पांढरे सोने जमिनदोस्त; पारोळा तालुक्यातील चित्र

खरिपाने मारले, रब्बीने अस्मान दाखवले

यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे रब्बीचा हंगाम जेमतेम आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे, असे शेतकरी जिकिरीने केळीबागा जगवत आहेत. मात्र वादळी पावसात त्याही भुईसपाट झाल्याने शेतकरी नशिबाला दोष देत रडताना दिसून आले. वडजी, पिचर्डे, शिवणी भागात शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते.

काहींनी डिसेंबर- जानेवारीत विहिरी तळ गाठेल म्हणून लवकर मका लागवड केली होती. मक्याला ऐन तुरा आलेला असताना पीक भुईसपाट झाल्याने खरिपाने मारले तर मारले रब्बीनेही शेतकऱ्यांना अस्मान दाखवले. शासनाने तत्काळ भरीव मदत करून शेतकऱ्यांना जगण्याची उमेद द्यावी, अशी मागणी होत आहे.

प्राथमिक नुकसान अहवाल

बाधित गावे ......... २९

बाधित शेतकरी ..... ४१०

एकूण नुकसान ..... १५४ हेक्टर

ज्वारी ............... ०९ हेक्टर

मका ................ ३८ हेक्टर

तूर .................. ०५ हेक्टर

केळी ............... ९२ हेक्टर

फळपिके ........... १० हेक्टर

"अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाला तत्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासन कामाला लागले आहे. येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देण्याची मागणी करणार आहोत. मी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे." - किशोर पाटील, आमदार : पाचोरा-भडगाव.

Banana crop in the field. Maize uprooted in the field due to the storm.
Jalgaon Unseasonal Rain: जिल्ह्यात 24 तासांत 31.8 मिलिमीटर पाऊस; गारपिटीने मोठे नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com