Jain Irrigation : जैनच्या एकत्रित उत्पन्नात 16 टक्के वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jain Irrigation Systems ltd.

Jain Irrigation : जैनच्या एकत्रित उत्पन्नात 16 टक्के वाढ

जळगाव : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या चौथ्या तिमाही तसेच चालू आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणापूर्वीच्या आर्थिक निकालास मंजुरी दिली. आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीमध्ये एकत्रित उत्पन्नात १६.२ टक्के वाढ दर्शविली आहे. ह्या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न ७११९.५ कोटी रुपये आहे जे गतवर्षी याच काळात केवळ ५६६६.९ कोटी रुपये इतके होते. कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी कंपनीच्या वाटचालीविषयी संवाद साधला.

निकालाची वैशिष्ट्ये अशी

- विदेशी बाजारपेठेतील चांगल्या मागणीमुळे हाय-टेक कृषी निविष्ठा उत्पादन विभागाने वार्षिक ६.८ टक्क्यां ची वाढ नोंदवली.

- सर्व उत्पादनांच्या साखळीमध्ये प्लॅस्टिक विभागाने सर्वाधिक वार्षिक ५०.१ टक्के वाढ नोंदवली.

- देशांतर्गत व परदेशातील बाजारपेठेतील उच्च विक्रीमुळे कृषी प्रक्रिया विभागाने वार्षिक १७.३ टक्के वाढ नोंदवली.

- कर्ज पुनर्रचनेच्या संकल्प योजनेच्या अंमलबजावणीमुळे एकवेळ नफा (अपवादात्मक बाबी) झाल्यामुळे करपश्चात नफ्यामध्ये लक्षणीय वाढ.

एकत्रित निकाल असा

- भारतासह परदेशातील सर्व प्रमुख व्यवसाय विभागांमध्ये सकारात्मक वाढीमुळे एकूण महसुलात २५.६ टक्के वाढ

- हाय-टेक अॅग्री इनपुट प्रॉडक्ट्स डिव्हिजनने २०.९% वार्षिक वाढ

- प्लॅस्टिक विभागामध्ये ४३ टक्के वार्षिक वाढीची भरभक्कम वाढ

- वैश्विक पातळीवर कंपनीकडे ३५९२.८ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स हाती आहेत, त्यात हाय-टेक ऍग्री इनपुट उत्पादने विभागासाठी २०४८.४ कोटी रुपये, प्लास्टिक विभागासाठी ६२७.६ कोटी रुपये आणि कृषी प्रक्रिया विभागासाठी ९३६.२ कोटी रुपयांच्या ऑर्डरचा यात समावेश आहे.

हेही वाचा: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव लोगोचा जळगाव मनपास विसर

''चौथ्या तिमाहीत सगळ्याच व्यवसायांमध्ये समाधानकारक काम व सुधारणा झाली. या आर्थिक वर्षांत कंपनीच्या कामकाजात प्रगती झाली आणि त्यात स्थैर्य आले.'' - अनिल जैन, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील 86 हजार शेतकऱ्यांना अनुदान...

Web Title: 16 Percent Increase In Jain Irrigation Combined Income Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaon
go to top