
16 वर्षीय मुलीवर बलात्कार; अश्लील फोटो केले व्हायरल
भडगाव (जि. जळगाव) : मामाकडे शिकत असलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन व त्यानंतर तिचे अश्लील फोटो काढत सोशल मीडियावर व्हायरल करत बदनामी केल्याबाबत दोन तरुणांविरुध्द भडगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २१ मार्च २०२२ रोजी हिंदीचा पेपर झाल्यावर दुसऱ्या- तिसऱ्या दिवशी कृष्णा चौधरी व त्याचा मित्र बंटी या दोघांनी पिडीतेस बरबाद करू अशी धमकी देत जबरदस्ती गाडीवर जबरदस्तीने बसवून एका लॉजवर नेले. या ठिकाणी कृष्णा चौधरी याने पिडीतेस ग्लास भर पाणी पिण्यास दिले आणि त्यानंतर पिडीतेवर बलात्कार केला. तसेच पिडीतेचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल केले. याप्रकरणी कृष्णा चौधरी (पूर्ण नाव माहित नाही), बंटी (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध ३७६, (२) पोस्को, कायदा कलम, १/४ आयटी एकटं ६६ (क ) ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. नि. अशोक उतेकर हे करीत आहेत.