पुण्यातील चौघांकडून 3 गावठी कट्ट्यांसह 17 जिवंत काडतुसे जप्त

Jalgaon Cime News
Jalgaon Cime Newsesakal

चोपडा (जि. जळगाव) : नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक (Special Inspector General of Police) व चोपडा ग्रामीण पोलिस यांच्या संयुक्त पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील लासूर - सत्रासेन रस्त्यावरील उत्तमनगरजवळ पोलिसांनी सापळा रचून पुणे येथील चार तरुणांकडून तीन गावठी कट्टे (Pistol) व सतरा काडतुसांसह (cartridges) सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई शनिवारी (ता. ४) सायंकाळी सातच्या सुमारास करण्यात आली. (17 cartridges 3 pistols seized from 4 persons from Pune in chopada Jalgaon Crime News)

तालुक्यातील सत्रासेन- लासूर रस्त्यावरील नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक व चोपडा ग्रामीण पोलिस यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी (ता. ४) सायंकाळी सातच्या सुमारास सापळा रचण्यात आला. या वेळी सत्रासेनकडून लासूरकडे येत असलेल्या होंडा कंपनीची कार (एमएच १२, एफ्यू ०३१६) उत्तमनगरजवळ नाकाबंदी करून अडविण्यात आली. या वेळी पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमधील रवींद्र वसंत खार्गे (वय २४), जयेश लक्ष्मण भुरूक (वय २४), जिजाबा मल्हारी फाडके (वय ३९), चांद पाशा अजिज शेख (वय ३२) (सर्व रा. वडगाव बुद्रुक, पुणे) यांच्याकडून तीन गावठी कट्टे व सतरा जिवंत काडतुसांसह सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Jalgaon Cime News
Jalgaon : अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी वाढदिवशी गाण्यावर धरला ठेका

या वेळी वरील चारही जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यातील जयेश भुरुके याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या कारवाईत पथकातील पोलिस निरीक्षक बापू रोहोम, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोलिस कर्मचारी रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शकील अहमद, पोलिस कर्मचारी मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मंडलिक, नारायण लोहारे तर चोपडा ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, पोलिस कर्मचारी किरण धनगर, राकेश पाटील, किरण पाटील यांचा सहभाग होता. पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे तपास करीत आहेत.

Jalgaon Cime News
Bhusawal : सव्वा कोटींच्या शेत रस्त्यांना मंजुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com