Jalgaon Crime : लाखोंची घरफोडी करणारे दोघे अटकेत | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon crime news

Jalgaon Crime : लाखोंची घरफोडी करणारे दोघे अटकेत

बातमीदार : जीवन चव्हाण

चाळीसगाव (जि. जळगाव) : भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून अज्ञाताने घरातील सोन्याचे दागिनेसह रोकड असे एकूण सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील श्रीकृष्णा कॉलनीत घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याजवळून दोन गुन्ह्यातील ७० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. (2 arrested for burglarizing lakhs Jalgaon Crime latest marathi news)

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील श्रीकृष्णा कॉलनी येथील दीपक रामराव देशमुख हे घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेलेले होते. याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरातील सोन्याच्या दागिनेसह रोकड असे एकूण २ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना १४ मे रोजी दुपारी घडली होती.

याप्रकरणी दीपक रामराव देशमुख यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार सुरु होता. यासाठी एका पथकाची निवड करण्यात आली होती. सदर इतर पोलीस स्थानकाच्या मदतीने शेख रहीम उर्फ शेख चांद (वय-२६) व शेख खय्युम शेख रफीक (वय-२०) दोघेही रा. कुर्बानी शहा नगर, परभणी यांना अटक करण्यात शहर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे.

हेही वाचा: टीप मिळताच अतिक्रमणे गायब; पथकाच्या माघारी नंतर परिस्थिती जैसे थे

त्यांची कसून चौकशी केली असता दोन गुन्ह्यातील चोरीची कबुली दिली. त्यावर शहर पोलिसांनी त्यांच्याजवळून ७० ग्रॅम सोना ताब्यात घेतला असून अजून गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तत्पूर्वी सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सुहास आव्हाड, पोना राहुल सोनावणे, पोना दीपक पाटील, पोना भूषण पाटील, पोकाँ निलेश पाटील, अमोल भोसले, अमोल पाटील, विजय पाटील, विनोद खैरनार, उज्वलकुमार मस्के आदींनी केली आहे.

हेही वाचा: Crime update : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

Web Title: 2 Arrested For Burglarizing Lakhs Jalgaon Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..