Jalgaon News : घरगुती ग्राहकाला पावणेदोन लाखांचे बिल

Mahavitran News
Mahavitran Newsesakal
Updated on

भुसावळ : शहरात वीज मीटरचे चुकीचे रिडिंग, बिलांच्या वाटपात दिरंगाई, मुदत संपल्यानंतर ग्राहकांना वीजबिलांचे वाटप, अशा तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्या आहेत. अशात एका ग्राहकाला चक्क १ लाख ८७ हजार ७५० रुपयांचे देयक देण्यात आले आहे.

प्रत्येक महिन्यात चुकीचे रीडिंग देऊन ग्राहकांना मनस्ताप देण्याचा प्रकार सुरूच असल्याने चुकीचे मीटर रीडिंग देणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (2 lakh bill to a domestic consumer Mahavitaran claims that reading has improved is false jalgaon news)

Mahavitran News
Nashik News: शालेय विद्यार्थ्यांना ई कचऱ्याचे धडे; पर्यावरण रक्षणासाठी नामांकित कंपनीचा अनोखा उपक्रम

चुकीच्या देयकांमुळे ग्राहक वीजबिल भरणा करीत नाही. चुकीच्या बिलांमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील जळगाव रोड परिसरात एका वीज मीटरवर (ग्राहक क्रमांक ११७७५५००६८५२) सध्या ६२८५ रीडिंग दिसत असताना त्यांना डिसेंबर महिन्याच्या आलेल्या बिलात चालू रिडिंग ६६१७ आलेले आहे.

म्हणजेच चक्क ३३२ अतिरिक्त रीडिंग दिले. जामनेर रोड परिसरातही (ग्राहक क्रमांक : ११७७५४०८९७०३) ४४९८ ऐवजी ५१२४ रीडिंग आलेले आहे. ६२७ अतिरिक्त रीडिंग देण्यात आले. साने गुरुजी नगरात (ग्राहक क्रमांक ११७७५०२३५६८३) २२६७ रीडिंग असताना २५९१ रीडिंग देण्यात आले आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Mahavitran News
Jalgaon News : Thirty First वरील नियंत्रणासाठी 2 पथके

तर काही ग्राहकांना रीडिंग न घेताच बिले देण्यात आली. खडका रोड विभागात एकाच ग्राहकाला (ग्राहक क्रमांक ११७७५०२८७३०६) तब्बल १०५७९ रीडिंगचे १ लाख ८७ हजार ७५० रुपयांचे देयक देण्यात आले. तसेच दुसऱ्या एका ग्राहकाला (ग्राहक क्रमांक ११७७५०२३१३८६) ४८२३ रीडिंगचे ८४ हजार ५२० रुपयांचे देयक देण्यात आले असून, या सर्व ग्राहकांना वीज देयक पाहून मानसिक त्रास होऊ लागला आहे.

‘महावितरण’ चा दावा फोल

अचूक बिलिंगसाठी शंभर टक्के अचूक रीडिंग हे महावितरणचे लक्ष्य आहे. त्यासाठी सुरू असलेल्या उपायांमुळे गेल्या दोन महिन्यांत बिलिंग व रीडिंगमध्ये सुधारणा झाली आहे. तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे, असे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले होते. मात्र भुसावळात रीडिंगमध्ये सुधारणा झालीच नाही, ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक बिल देणे, ही महावितरणची जबाबदारी आहे. सदोष व चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांचा रोष वाढला आहे. महावितरणचा दावा फोल ठरला असल्याचे मत प्रा.धीरज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Mahavitran News
Nashik News | सिडकोतील वरद विनायक गणपती उद्यान : खेळण्या तुटलेल्या अवस्थेत; ग्रीन जिम फक्त नावाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com