Latest Marathi News | STच्या भंडार विभागात 2 लाखांचा अपहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Embezzlement

Jalgaon News : STच्या भंडार विभागात 2 लाखांचा अपहार

जळगाव : राज्य परिवहन विभागाच्या जळगाव बस आगाराच्या नेरीनाका येथील एसटी वर्कशॉपमध्येच विभागीय भंडार आहे. त्या ठिकाणी लिपिकानेच एक लाख ९९ हजार ३७० रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

परिवहन विभागाच्या जळगाव बस आगाराच्या नेरी नाकास्थित वर्कशॉपमध्ये विभागीय भंडार आहे. तेथे बस दुरुस्तीसह स्पेअरपार्ट्‌स आणि इतर साहित्य साठविण्यात येते.(2 Lakh embezzlement in Bhandar section of ST Jalgaon News )

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची..

हेही वाचा: Jalgaon News : व्यवस्थापकाचा कोट्यवधींच्या सोन्यावर डल्ला; संशयिताच्या शोधार्थ पथके रवाना

तेथील लिपिक हेमराज युवराज पाटील (रा. चिंचोली, ता. यावल) यांनी १५ मार्च २०१९ ते २४ सप्टेंबर २०१९ दरम्यान ट्रान्सपोर्टमधून सामान सोडविण्यासाठी एक लाख ९९ हजार ३७० रुपयांची वेळोवेळी अग्रीम रक्कम उचलली.

मात्र, त्या रकमेचा समायोजन न करता त्याचा अपहार केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. या रकमेत अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर विभाग भंडाराचे अधिकारी विशाल बळीराम राखुंडे (वय ४२) यांनी वरिष्ठांना त्याची कल्पना दिली.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार विशाल राखुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित लिपिक हेमराज युवराज पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon Exclusive Story : वृद्ध आईने किडनी देऊन मुलाला दिला पुनर्जन्म