Jalgaon : भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

2 wheeler under  mehkar bus Inset died roshan kongale
2 wheeler under mehkar bus Inset died roshan kongaleesakal

जळगाव : नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलाजवळ भरधाव बसने दिलेल्या धडकेत (Collision) दुचाकीस्वार जागीच ठार (Death) झाला. ही घटना बुधवारी (ता. ६) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. रोशन मनोहर कोंगळे (वय २० रा. झोडगा ता. मलकापूर) असे मृत तरुणाचे तरुणाचे नाव आहे. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. (2 wheeler driver killed in Bhardhav bus collision Jalgaon News)

गेल्याच आठवड्यात या पुलावर दोन पिकअप व्हॅनला चिरडल्याने चौघांचा मृत्यू झाला होता. आठवडाभरात ही दुसरी घटना घडली. रोशन मनोहर कोंगळे बुधवारी (ता. ६) दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीने भुसावळकडून जळगावकडे येत होता. नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलावर समोरून येणारी जळगावकडून भुसावळमार्गे मेहकरकडे जाणाऱ्या भरधाव बसने (एमएच ४०, एक्यू ६२७०) दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रोशन कोंगळे हा तरुण जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

2 wheeler under  mehkar bus Inset died roshan kongale
साहेब, गाडी फिरली तरच चूल पेटते!

पुलावरील काळा बुधवार

याच मार्गावर १ जुलैस अज्ञात वाहनाच्या धडकेत मोहिब्बुल हक मनियार (वय ३९) यांचा अपघात होऊन वाहनचालक फरारी झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. नशिराबाद पुलावर गेल्या २९ जूनला बुधवारीच सुसाट ट्रकने दोन महिंद्रा पिकअप व्हॅनला धडक दिली. यात वाहनांचा चुराडा होऊन प्रवासी पुलावरून फेकले जाऊन चौघांचा बळी गेला होता. या घटनेला सात दिवस उलटत नाही, तोच पुन्हा बुधवारी (ता.६) याच पुलावर अपघाती मृत्यू ओढवला.

2 wheeler under  mehkar bus Inset died roshan kongale
उपचारासाठी प्रयत्‍न पण आई- वडील गमावले; पतीला बेड न मिळाल्याने पत्नीला हृदयविकाराचा झटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com