सिहोरहून परततांना जुलवानीया येथे अपघातात पातोंड्याच्या 2 महिलांचा मृत्यू : Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

Jalgaon News : सिहोरहून परततांना जुलवानीया येथे अपघातात पातोंड्याच्या 2 महिलांचा मृत्यू

पातोंडा (जि. जळगाव) : आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास सिहोर कुबेरेश्वर धाम येथून परत येतांना जुलवानीया (मध्यप्रदेश) येथे इको गाडी क्र. एम एच 19 डीव्ही 6783 ला अपघात होऊन

कमलबाई आत्माराम पाटील (वय 55 वर्ष) व शोभाबाई लुकडू पाटील (वय 52 वर्ष) यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. (2 women died in an accident while returning from Sehore jalgaon news)

पातोंडा येथून दि. 13 रोजी चार इको व्हॅनसह अनेक भाविक कुबेरेश्वर धाम सिहोर येथे रवाना झाले होते. आज पहाटे पाच वाजेच्या सुमाराम कुबेरेश्वर धाम येथून परत येतांना एबी रोड जयस्वाल ढाबाजवळ जुलवानीया (मध्यप्रदेश) येथे इको व्हॅन क्र क्र. एम एच 19 डीव्ही 6783 ला अपघात होऊन गाडी चालक नितीन पारधी सह निर्मलाबाई विनायक पाटील (वय 56 वर्ष) ,

राजकुवर नरेंद्र पाटील (वय 67 वर्ष) , मंगलबाई भास्कर पाटील (वय 60 वर्ष) , कमलबाई रतिलाल पारधी (वय 62 वर्ष ) यांना जबर दुखापत झाली तर कमलबाई आत्माराम पाटील व शोभाबाई लुकडू पाटील यांना डोक्याला जबर दुखापत झाल्याने जागीच मृत्यु झाला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

सदर घटनेची माहिती राजेंद्र वाणी यांनी जुलवानीया पोलीस स्टेशनला दिल्यानंतर मध्यप्रदेश पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने जखमींना पुढिल उपचारा करीता धुळे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तसेच मयत शोभाबाई पाटील व कमलबाई पाटील यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र जुलवानीया (मध्यप्रदेश) येथे शवविच्छेदन करण्यात आले.

जुलवानीया व ओझर येथील मोहनलाल मिस्तरी , अजय मिस्तरी , दिपकजी शर्मा , कमलेश जयस्वाल , पोलीस उपनिरीक्षक रेवाराम चौहान , पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत सोलंकी यांनी सहकार्य केले.

मयत महिला एकाच कुटूंबातील -

शोभाबाई व कमलबाई ह्या एकाच कुटूंबातील असून कमलबाई पाटील ह्या जेठाणी असुन शोभाबाई पाटील ह्या त्यांच्या दिराणी आहेत. शोभाबाई पाटील यांचे पश्चात पती , एक मुलगा , सुन , नातवंडे व दोन मुली तर कमलबाई पाटील यांचे पश्चात पती , दोन मुले , सुना , नातवंडे व एक मुलगी असा परीपार आहे.