जळगाव : पारोळ्यात किराणा दुकान फोडून 20 हजार रुपये लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Theft

जळगाव : पारोळ्यात किराणा दुकान फोडून 20 हजार रुपये लंपास

पारोळा (जि. जळगाव) : येथील पालिका चौकातील हमरस्त्यावरील किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातून वीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सकाळी चारच्या सुमारास घडली. दरम्यान, दुकान फोडण्याचे चित्रीकरण ‘सीसीटीव्ही’त कैद झाले असून चोरट्यांचा पोलीस तपास करीत आहे.

येथील पोलिसात राम हिंदुजा यांनी फिर्याद दिली, की सोमवारी (ता. २३) रोजी रात्री नऊ ते पहाटे चारच्या दरम्यान, शहरातील नगरपालिका चौकातील सीताराम डिलाराम किराणा मर्चंट या दुकानाच्या शटरचे कडी कोयंडा तोडून दुकानातील गल्ल्यामधून वीस हजारांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली. याबाबत पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक प्रवीण पारधी तपास करीत आहे. दरम्यान, पहाटे चारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांना या किराणा दुकानात मोठी रक्कम न मिळाल्याने त्यांनी दुसरे दुकान टार्गेट केले होते. त्याचवेळी रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस नाईक बापू पारधी, हवालदार राहुल कोडी, दीपक अहिरे व चालक अनिल वाघ यांना चोरटे दिसले. या सर्वांनी चोरट्यांचा कजगाव नाक्याजवळील पेट्रोल पंपापर्यंत पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत चोरटे हे वेगळ्या मार्गाने पसार झाले. दरम्यान चोरटे पळत असताना त्यांची मोटरसायकल पोलिसांना मिळून आली. केवळ रात्री पोलिसांची पेट्रोलिंग सुरु असल्याने बाजारपेठेतील इतर दुकानांमध्ये चोरी होण्यापासून वाचली. दरम्यान, किराणा दुकानात झालेली चोरी ‘सीसीटीव्ही’त कैद झाली असून पोलिसांनी त्यादृष्टीने चोरट्यांचा तपास सुरु केला आहे.

हेही वाचा: Jalgaon : एटीएमद्वारे शेतकऱ्याला ३६ हजारास गंडवले

हेही वाचा: Jalgaon : चोरीच्या उद्देशाने हिंडणारा संशयीत अटकेत

Web Title: 20 Thousand Looted From A Grocery Store In Parola Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonCrime News
go to top