Jalgaon : एटीएमद्वारे शेतकऱ्याला ३६ हजारास गंडवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ATM cheating Case

Jalgaon : एटीएमद्वारे शेतकऱ्याला ३६ हजारास गंडवले

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील पिंप्री येथील एका शेतकऱ्याला पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एकाने एटीएम कार्ड बदलवून (ATM Card Swapping) परस्पर ३६ हजार रुपये काढून शेतकऱ्याची फसवणूक (Cheating) केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Farmer lost Rs 36000 through ATM Jalgaon Crime News)

याबाबत सविस्तर वृत्त, तालुक्यातील पिंप्री येथील सतीश दगडू चव्हाण (वय- ४४) हा वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. शेती व्यवसाय करून तो आपल्या कुटुंबाची जबाबदारी हाकत असतो. शेती हि आईच्या नावावर असल्याने शेती कर्जासाठी जेडीसीसी बँक शाखा गणपूर येथे आईच्या नावाने खात उघडण्यात आला आहे. त्यात पीक कर्जाचे ४०,००० रुपये पडून होते. त्यापैकी चव्हाण यांनी १० हजार रुपये अलिकडेच कामानिमित्त काढले होते. त्यानंतर खात्यात ३६,००० रुपये बाकी होते. उर्वरित रक्कम काढण्यासाठी सतीश दगडू चव्हाण हा १८ मे रोजी दुपारी चाळीसगाव येथे आला. तेव्हा तो शहरातील भडगाव रोडवरील एसबीआय बँक एटीएमवर पैसे काढायला आला. परंतु तांत्रिक अडचणीमुळे पैसे निघाले नाही.

हेही वाचा: Jalgaon : चोरीच्या उद्देशाने हिंडणारा संशयीत अटकेत

तेवढ्यात पाठीमागील अंदाजे ३५ ते ४० वर्षाच्या इसमाने पैसे काढून देण्याच्या बहाण्याने चव्हाण कडून एटीएम कार्ड घेतला. व पिन टाकायला लावला. तरीही पैसे मशीन बाहेर आले नाही. म्हणून सदर इसमाने आपल्याजवळील ब्लॉक एटीएम कार्ड चव्हाणांच्या हातात देऊन तो निघून गेला. त्यानंतर चव्हाण हे पुन्हा पैसे काढायला २० मे रोजी आले. तेव्हा सदर कार्ड ब्लॉक असल्याचे कळाले. मग बँकेच्या शाखेला भेट देऊन चौकशी केली असता सदर कार्ड अलकाबाई नारायण पाटील या नावाचे निघाले. चव्हाणांनी खात्यातील पैशाची खात्री केली. तर खात्यातील ३६,००० रुपये अज्ञाताने काढलेले दिसून आले. त्याचवेळी सतीश चव्हाण यांना धक्का बसला. व १८ मे रोजी अंदाजे ३५ ते ४० वर्षाच्या इसमानेच आपली फसवणूक केल्याची खात्री झाली.

हेही वाचा: अंधार अन्‌ हेडफोनने तरुणीचा घात!; भरधाव रेल्वेची जबर धडक

त्यानंतर चाळीसगाव पोलीस स्थानक गाठून सतीश दगडू चव्हाण यांने भादंवि कलम- ४२० प्रमाणे अज्ञातांविरुद्ध २३ मे रोजी रात्री गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी अशा फसवणुकीपासून सावधान राहण्याचे आवाहन चाळीसगाव शहर पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोना दीपक पाटील हे करीत आहे.

Web Title: Farmer Lost Rs 36000 Through Atm Card Swapping In Chalisgaon Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top