
जळगाव : सक्रिय रुग्णसंख्या आता 2 हजारांवर
जळगाव : जिल्ह्यात कोरोना (Corona) रुग्णसंख्येचा वाढता आलेख कायम आहे. रविवारी नव्या ३५४ बाधितांची नोंद झाली, तर दिवसभरात ७९ रुग्ण बरे झाले. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजारांहून अधिक झाली आहे.
2058 रुग्ण लक्षणे विरहित
जळगाव जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून रुग्णसंख्या वाढू लागली. तिसऱ्या लाटेला (Third wave) ही सुरुवात होती. आता राज्यात व पर्यायाने जळगाव जिल्ह्यातही तिसऱ्या लाटेची तीव्रता वाढू लागली आहे. शनिवारी आरटीपीसीआर (RT_PCR) व ॲन्टीजेन (Antigen) अशा एकूण १९४९ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून ३५४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. तर ७९ रुग्ण दिवसभरात बरे झाले. आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २१२१ असून पैकी तब्बल २०५८ रुग्ण लक्षणे विरहित आहे. ज्या ६३ रुग्णांमध्ये लक्षणे आढळून येत आहेत, त्यातील केवळ ४४ रुग्णच दाखल आहेत. तर सध्या ११ रुग्णांनाच ऑक्सिजनची (Oxygen) गरज भासत आहे.
हेही वाचा: कोरोना कायमस्वरूपी राहू शकत नाही - विषाणूशास्त्रज्ञ
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर १०८, भुसावळ १३२, जळगाव ग्रामीण १२, अमळनेर १९, चोपडा १९, भडगाव ३, यावल २, एरंडोल ४, जामनेर १०, रावेर ६, पारोळा १२, चाळीसगाव १४, मुक्ताईनगर ६, बोदवड ७
हेही वाचा: राज्यात 41 टक्के मुलांना लसीकरण
Web Title: 2000 Active Corona Patients In Jalgaon District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..