Latest Marathi News | फुकट्या प्रवाशांकडून २३ लाख वसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway News

Jalgaon News : फुकट्या प्रवाशांकडून २३ लाख वसूल

जळगाव, ता. १८ : भुसावळ रेल्वे विभागाने रविवारी (ता. १८) अचानक तिकीट तपासणी मोहीम राबविली. त्यात फुकट्या प्रवाशांकडून २३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडीया यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागात वाणिज्य विभाग व आरपीएफ विभागातर्फे खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, चाळीसगाव- धुळे, जलंब-खामगावदरम्यान एकदिवसीय तिकीट चेकिंग मोहीम राबविण्यात आली. (23 lakh recovered from free passengers Jalgaon News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

हेही वाचा: Jalgaon News : आमदार चव्हाण अध्यक्षपदी बिनविरोध

वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासनीस आणि आरपीएफचे संयुक्त पथक तयार करून सुमारे ८६ गाड्यांमध्ये तपासणी करण्यात आली. नाशिक, मनमाड, भुसावळ, खंडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवरही तपासणी करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तीन अधिकारी, १८० तिकीट चेकिंग स्टाफ, ४५ वाणिज्य स्टाफ व ५५ आरपीएफ स्टाफ, असे एकूण २८० कर्मचाऱ्यांंनी प्रयत्न केले.

ओपन डिटेल स्टाफने तीन हजार ४१९ केसेस करून १९ लाख ९७ हजार, ५६५ रुपयांचा दंड वसूल केला. स्टेशन स्टाफने २०३ केसेस करून १ लाख ५ हजार २७० रुपये, अमेनिटी स्टाफने २९३ केसेस करून २ लाख २४ हजार २५१ रुपयांचा दंड वसूल केला. असा एकूण टोटल केसेस तीन हजार ९१५ केसेस करून त्याद्वारे एकूण २३ लाख २७ हजार ८६ दंड वसूल केला आहे.

हेही वाचा: Jalgaon News : जिल्हा बँक, दूध संघापलीकडेही विकासाचे जग आहे!