Jalgaon News : जिल्हा बँक, दूध संघापलीकडेही विकासाचे जग आहे!

District Milk Union Election
District Milk Union Electionesakal

जळगाव : गेल्या आठवड्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्याच्या समृद्धीत भर घालणाऱ्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करत असताना, जळगाव जिल्ह्यातील राजकीय दिग्गज दूध संघाच्या क्षुल्लक निवडणुकीत गुरफटून त्यातील विजयाचा निरर्थक जल्लोष करीत होते.

दूध संघ, जिल्हा बँकेच्या पलीकडेही विकासाचे एक जग आहे आणि तो आपल्या भागात साधायचा असेल, तर तसे ‘समृद्ध’ व्हीजनही असावे लागते, हा समजही नसण्याइतपत जळगावचे नेतृत्व अपरिपक्व असेल, तर या उपेक्षित खानदेशकडे समृद्धीचा महामार्ग तर दूरच त्याची पाऊलवाटही वळणार नाही, हे या धुरिणांनी लक्षात असू द्यावे. (Monday Column Written By Sachin Joshi About District Milk Union topic Jalgaon News)

District Milk Union Election
Jalgaon News : राष्ट्रीय महामार्ग दुर्दशेचा, धुराळा नागपूर अधिवेशनात

गेल्या आठवड्यात राज्याच्या समृद्धीत भर घालणाऱ्या दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यातील पहिली घटना पंतप्रधानांनी नागपुरात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. मुंबई ते नागपूर अंतर निम्म्याने कमी करणाऱ्या या महामार्गामुळे राज्याच्या दोन राजधान्याच नव्हे, तर दोन टोके जोडली जाणार असून, महामार्गाच्या टप्प्यातील दहा व लगतच्या २४ जिल्ह्यांना त्याचा ‘कनेक्ट’ मिळणार आहे. प्रशस्त महामार्गांना विकासाचे प्रतीक मानले गेलेय.

त्यामुळे या महामार्गाने राज्याच्या एकूणच विकासात समृद्धी येणार, असा विश्‍वासही व्यक्त केला जातोय. महामार्गाच्या प्रत्यक्ष टप्प्यात नसले तरीही काही जिल्हे त्यापासून ६०- ७० किलोमीटरच्या टप्प्यात असल्याने अप्रत्यक्षपणे या जिल्ह्यांचेही ‘भलं’ होणार आहे,पण हा राज्यात समृद्धी आणणारा महामार्ग खानदेश व प्रामुख्याने जळगावसारख्या नेहमीच उपेक्षित राहिलेल्या जिल्ह्याच्या जवळपासनेही फिरकत नाही, हेच आपले दुर्दैवं म्हणावे लागेल.

एरवी ‘समृद्धी’च्या आधी मुंबईला नागपूरशी कनेक्ट करणारा राष्ट्रीय महामार्ग नाशिक-धुळेमार्गे जळगावहूनच मार्गस्थ होता. मुंबईपासून धुळ्यापर्यंत तो चौपदरी व पुढे शिरपूर, इंदूरमार्गे आग्रापर्यंत प्रशस्त आहे. धुळ्यापासून विदर्भाकडे जाताना व्हाया जळगाव मात्र या महामार्गाच्या चौपदरीकरणाला ‘मार्ग’च सापडलेला नाही.

२०१२ पासून नवापूर-अमरावती टप्पा असलेल्या चौपदरीकरणाला जे ग्रहण लागले ते आजपर्यंत मिटलेले नाही. त्यातील तरसोद-चिखली टप्पा पूर्ण झालाय. चिखली ते अमरावतीचे काम संथगतीने सुरू आहे. फागणे-तरसोद टप्प्याच्या कामाचीही तीच अवस्था आहे. गुजरात व मध्य प्रदेशला व्हाया खानदेश जोडणारा अंकलेश्‍वर-बऱ्हाणपूर महामार्गाच्या सर्वेक्षण, डीपीआरचा पत्ता नाही, अशा स्थितीत समृद्धी महामार्ग कार्यान्वित होणे, हे मुंबई- नागपूरमधील व्हाया जळगाव जाणाऱ्या वाहतुकीवर विपरित परिणाम करणारा घटक तर ठरेलच, शिवाय आहे ते ‘पोटेन्शियल’ही लयास जाईल.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

District Milk Union Election
Jalgaon News : राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत तिसरे पॅनल निवडणूक रिंगणात

दुसरी घटना आहे, राज्यात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून होणारी ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीची. यातही नाशिकला प्रकल्प आहे. औरंगाबादला एक हजार ९०० कोटींच्या गुंतवणुकीची तरतूद आहे. खानदेश, जळगाव जिल्ह्याचा कुठेही पत्ता नाही. शहरातील रस्ते, गटारांसारख्या मूलभूत सुविधांसाठीच संघर्ष करणाऱ्या जळगावकरांना कोटींची गुंतवणूक, रोजगाराची उपलब्धता, महामार्ग विकासाची समृद्धी ही केवळ स्वप्नेच ठरावीत.

दुर्दैवाने जिल्हा बँक, दूध संघ, ग्रामपंचायतीसारख्या क्षुल्लक निवडणुका प्रतिष्ठेच्या करून, एकमेकांना नामोहरम करण्याचा चंग बांधत आदळआपट करणाऱ्या जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाला या विकासाच्या योजनांबाबत देणेघेणे नाही. ज्यावेळी ‘समृद्धी’च्या निर्माणाची कोनशिला ठेवली गेली, तेव्हा हा महामार्ग जळगाव जिल्ह्यातून नव्हे, तर किमान जळगावला नजीक असलेल्या जगविख्यात अजिंठा या पर्यटनस्थळाजवळून जावा, यासाठी तत्कालीन स्थानिक नेतृत्वाने प्रयत्न केले नाहीत.

फडणवीस सरकारच्या काळात पहिले दीड वर्ष जळगाव जिल्ह्यात खडसे- महाजनांच्या रूपाने दोन कॅबिनेट व गुलाबराव पाटलांकडील राज्यमंत्रिपद असे तिहेरी नेतृत्व होते. राज्यात व केंद्रात भाजपच्या नेतृत्वातील ‘डबल इंजिन’ सरकार होते. तरीही जळगावचा भाग्योदय झालाच नाही. नंतर ‘मविआ’च्या सरकारमध्येही काही साधता आले नाही. एकमेकांविरोधात ‘काड्या’ करण्यापलीकडे आपल्या क्षेत्राचा विकास या विषयावर ना तेव्हा कुणी गंभीर होते, ना आताच्या सत्ताधाऱ्यांना चिंता आहे. आपले राजकारणच जिल्हा बँक, दूध संघ, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींच्या डबक्यापुरतं मर्यादित राखणाऱ्या या नेत्यांमध्ये विकासाच्या सागरात पोचण्याची क्षमता कधी निर्माण होणार, हा प्रश्‍नच आहे.

या सर्व स्थितीत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे ‘आपण चुकीचे लोक निवडून देतो. त्याची फळं भोगतो’, असे वक्तव्य चुकीचे वाटत असले, तरी ते विचार करायला लावणारे नक्कीच आहे.

District Milk Union Election
Jalgaon News | पराभवाचे दुखणे खेळाच्या मैदानात काढणे हास्यास्पद : भूषण भदाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com