
सर्पदंशाने 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू
यावल (जि. जळगाव) : तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील गाडऱ्या गावात एका आदिवासी तरुणीचा सर्पदंशाने जागीच मृत्यू झाला.
गाडऱ्या (ता. यावल) येथील फुगली भाया बारेला (वय २३) ही तरूणी मंगळवारी (ता.१२) आपल्या कुटुंबासोबत गाडऱ्या शिवारातील शेतात सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास तूर कापणीचे काम करीत असताना अचानक एका विषारी सर्पाने तिच्या उजव्या हातावर दंश केला. हा दंश करणारा साप अत्यंत विषारी असल्याने त्या तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला.
हेही वाचा: सर्पदंश झालेल्या महिलेचा अंधश्रद्धेने घेतला बळी; उपचाराअभावी मृत्यू
या घटनेची माहिती मिळताच गावातील सरपंच भरत बारेला, पोलिस पाटील तेरसिंग बारेला व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले. या वेळी सरपंच आणि पोलिस पाटील यांनी वेळेवर रूग्णवाहिका मिळू न शकल्याने खासगी वाहनाने सुमारे ८० किलोमीटरवर असलेल्या यावल ग्रामीण रुग्णालयात त्या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणला. या संदर्भात पोलिस पाटील तेरसिंग बारेला यांनी पोलिसांना खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी व पोलिस तपास करीत आहेत. शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांनी केले.
हेही वाचा: आसाममध्ये विषारी मशरुम खाल्लाने 16 लोकांचा मृत्यू
Web Title: 23 Yearold Girl Died On The Spot Due To Snake Bite Jalgaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..