धक्कादायक! निवडणूक निकालानंतर तुफान राडा; दगडफेकीत 25 वर्षीय भाजप कार्यकर्ता ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election Result 2022

निवडणूक निकालांनंतर जल्लोष सुरु असतानाच जळगावातून धक्कादायक बातमी समोर आलीये.

धक्कादायक! निवडणूक निकालानंतर तुफान राडा; दगडफेकीत 25 वर्षीय भाजप कार्यकर्ता ठार

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालंय.

दरम्यान, राज्यभरात निवडणूक निकालांनंतर जल्लोष सुरु असतानाच जळगावातून धक्कादायक बातमी समोर आलीये. निवडणूक निकालानंतर दोन गट आमने-सामने आले. दोन्ही गटातील कार्यकर्ते परस्परांत भिडले. यावेळी दोन समूहांकडून तुफान दगडफेक देखील करण्यात आली.

या प्रकारात एक भाजपचा (BJP) कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. दुर्दैवानं यात त्याचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी इथं ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले.

त्यातील भाजपचा धनराज माळी नावाचा २५ वर्षीय कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. कार्यकर्त्यांनी जखमीला तत्काळ सरकारी रुग्णालयात नेलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जळगावात खळबळ माजलीये. आहे. जळगाव जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींचे निकाल आज समोर येत आहेत.