

Tension in Pimpalner as Maternal Death Leads to Protest Against Doctors
sakal
पिंपळनेर : येथील खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर २५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याने मंगळवारी (ता. १४) शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. संतप्त नातेवाइकांनी मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून संबंधित रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन करीत डॉक्टरांविरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपळनेर पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवत राज्य राखीव पोलिस पथकाला पाचारण केले.