Dhanteras : धनत्रयोदशी सुवर्ण व्यावसायिकांना पावली; एकाच दिवसात 250 कोटींची उलाढाल | Latest Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratanlal C. to buy gold on Saturday. Crowd in Bafna Shoru.

Dhanteras : धनत्रयोदशी सुवर्ण व्यावसायिकांना पावली; एकाच दिवसात 250 कोटींची उलाढाल

जळगाव : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शनिवारी (ता. २२) सोने खरेदीचा उच्चांक झाला. एकाच दिवसात शहरासह जिल्हयात पन्नास किलोपेक्षा अधिक सोन्याची विक्री झाली. सुमारे २५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे. मोठ्या शोरूममध्ये तर ग्राहक सकाळपासूनच सोने खरेदीसाठी ‘वेटिंग’वर दिसून आले.

शोरूमध्ये प्रचंड गर्दी होती. तब्बल दोन वर्षांनंतर धनत्रयोदशीला एवढ्या मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे. सोबतच लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांसह तयार फराळ, लाडू, पेढे आदींच्या खरेदीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. (250 crore turnover in single day on Dhanteras 2022 diwali festival Latest Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon Agitation : 20पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत

दिवाळीत येणाऱ्या धनत्रयोदशीला नवीन सोने खरेदीने वर्षभर सुवर्ण खरेदीचा योग येतो, असे सांगीतले जाते. सुवर्णरूपी धनाची, पैशांची पूजा केली जाते. धन्वंतरी जयंती असल्याने धन्वंतरी देवतेची आराधना करून सुदृढ आरोग्याची मनोकामना केली जाते. यामुळे धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुवर्ण बाजारात आज सोन्याचे विविध प्रकारचे आकर्षक दागिने, फॅन्सी दागिने, मणी मंगळसूत्र, बांगड्या, अंगठी, ब्रासलेट आदींना मोठी मागणी होती. काहींनी सुवर्ण चीपही खरेदी केल्या. सकाळपासून सर्वच सुवर्ण दुकानांत गर्दी असल्याचे चित्र होते.

दरात वाढ, तरी खरेदी मोठी

सोन्याचा दर आज ५१ हजार ३०० अधिक जीएसटी, असा ५२ हजार ८३९ रुपये प्रतितोळा होता. कालचा दर विना जीएसटी ५० हजार ३०० होता. आता त्या दरात एक हजाराची वाढ झाली असली तरी सोने खरेदी तुफान झाली. चांदीचा दर काल ५७ हजार प्रतिकिलो होता. आत ५९ हजार रुपये प्रतिकिलो (जीएसटी विना) होता. तब्बल दोन हजारांची वाढ चांदीच्या दरात झाली आहे.

हेही वाचा: Guardian Minister Gulabrao Patil : आनंदाचा शिधा पासून लाभार्थी वंचित राहू नये

सोने-चांदी सोबतच तयार फराळाला बाजारात मोठी मागणी होती. २४० रुपये किलोपासून चारशे रुपये प्रतिकिलो दराने फराळ उपलब्ध होता. मिठाई चारशे रुपयांपासून एक हजार रुपये प्रतिकिलो उपलब्ध होते. लक्ष्मीपूजनासाठी लागणारी लहान केरसुणी, लक्ष्मीचा फोटो, साळीच्या लाह्या, बत्ताशे, विविध प्रकारची फळे, उसाला मोठी मागणी होती. आज जळगाव शहराचा शनिवारचा बाजार असतो. नागरिक साप्ताहिक खरेदीसाठी शहरात येतात. दिवाळीची खरेदीसाठी बहुतांश ग्राहक बाजारपेठेत असल्याने गर्दीचा उच्चांक झाला.

वाहने लावण्यासाठी जागा नाही

शहरात दुचाकी, चारचाकी वाहने लावण्यासाठी जागा नसल्याचे चित्र होते. ज्या जागा ‘पे ॲन्ड पार्क’ अशा होत्या. त्याही फुल झाल्याने नागरिकांनी बाजारपेठेच्या आजूबाजूच्या परिसरात आपली वाहने लावली होती. मोठी वाहन शहरातून नेताना अनेक अडचणींचा सामना सहन करावा लागला. गर्दीमुळे रस्त्यातून वाहन काढणे जिकिरीचे काम होते.

हेही वाचा: Jalgaon : जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतींच्या मतदारयाद्यांवर वर 205 हरकती