Latest Marathi News | जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतींच्या मतदारयाद्यांवर वर 205 हरकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Voter List Objection

Jalgaon : जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतींच्या मतदारयाद्यांवर वर 205 हरकती

जळगाव : जिल्ह्यात १४० ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ दरम्यान संपुष्टात येत आहे. ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय मतदारयादी प्रक्रिया १३ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारूप प्रभागनिहाय मतदारयाद्यांवर स्थानिक स्तरावर २०५ हरकती व सूचना प्राप्त झाल्या असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाने दिली.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायत सदस्य, सरपंचांचा पंचवार्षिक कार्यकाळ मुदत पूर्ण होत आहे. अशा मुदत पूर्ण असलेल्या १४० ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदारयादी प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते.(205 objections to voters list of 140 Gram Panchayats in district Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon : ‘भारत जोडो’ त जिल्ह्यातील 200 कार्यकर्ते सहभागी होणार

त्यानुसार १४० ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या १३ ऑक्टोबर २०२२ ला प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर १३ ते १८ ऑक्टोबरदरम्यान हरकती व सूचना मागविण्यात आल्या. यात जिल्हाभरातून प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध झालेल्या ग्रामपंचायत स्तरावर २०५ हरकती प्राप्त झाल्या आहेत.

या ग्रामपंचायतनिहाय प्रभाग मतदार प्रारूप मतदारयाद्यांवर हरकतींची सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाईल, असे ग्रामपंचायत विभागातर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा: Water Supply Minister Gulabrao Patil Statement : पाणी आकाशातून टाकणार काय ?

तालुका-- ग्रामपंचायती-हरकती व सूचना

जळगाव-१२--४

जामनेर--१२--९

अमळनेर--२४--२७

रावेर--२२--१८

चाळीसगाव--१६--१९

पारोळा--९---१७

यावल--८--२२

धरणगाव--७--०

एरंडोल--६--२२

भुसावळ--६--८

भडगाव--६--३५

बोदवड--५--११

चोपडा--५--५

मुक्ताईनगर--२--८

एकूण ः १४०--२०५

हेही वाचा: Eknath Khadse Taunting Statement : शिंदे-फडणवीस गटाचे आमदार अस्वस्थ