Jalgaon News : जातवैधता प्रमाणपत्र अर्जावर आक्षेपांसाठी 28 ची मुदत

28 deadline for objections to caste validity certificate application jalgaon
28 deadline for objections to caste validity certificate application jalgaonesakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केले आहेत‌. (28 deadline for objections to caste validity certificate application jalgaon news)

या सदस्यांच्या जातवैधता प्रस्तावाबाबत काही आक्षेप असल्यास २७ डिसेंबरपर्यंत ते जिल्हा समितीकडे नोंदवावेत, असे आवाहन जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य व्ही. एम. वाकुलकर यांनी केले. मागासवर्गीय उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा समितीकडे अर्ज प्राप्त झाले आहेत‌. जे उमेदवार मागासवर्ग प्रवर्गातून निवडून आले होते.

त्या उमेदवारांच्या अर्जावर समिती स्तरावर कार्यवाही सुरू असून, निवडून आलेल्या उमेदवारांच्या दाव्याबाबत कोणाला काही हरकत, आक्षेप असेल, तर त्यांनी २७ डिसेंबर २०२३ पर्यंत समिती स्तरावर आपली हरकत, आक्षेप, लेखी स्वरूपात शपथपत्रावर पुराव्यासह सादर करावेत.

28 deadline for objections to caste validity certificate application jalgaon
Jalgaon News : एरंडोल-पारोळा मतदारसंघासाठी 40 कोटींचा निधी; रस्ते, पुलांची कामे होणार

वैधता प्रमाणपत्र निर्गमित झाल्यानंतर आक्षेपाची दखल घेण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. साध्या कागदावर निनावी, पुराव्याशिवाय घेतलेल्या आक्षेपाची दखल घेण्यात येणार नाही, असे श्री. वाकुलकर यांनी कळविले आहे.

28 deadline for objections to caste validity certificate application jalgaon
Jalgaon News: बोदवड सिंचन योजनेसाठी 278 कोटी मंजूर; पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत मान्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com