Jalgaon News: बोदवड सिंचन योजनेसाठी 278 कोटी मंजूर; पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत मान्यता

Funding
Fundingesakal

Jalgaon News: केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा १ च्या कामांसाठी २७८ कोटी ६२ लाखांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.

यामुळे जिल्ह्यातील बोदवड, जामनेर, मुक्ताईनगर तालुक्यांतील आठ हजार ४७७ हेक्टर लाभक्षेत्र सुजलाम् सुफलाम् होईल. जळगाव, बुलढाणा जिल्ह्यांतील ५३ हजार ४४९ हेक्टर क्षेत्रासाठी ही योजना संजीवनी ठरणारी आहे. निधीमुळे आता योजनेच्या कामाला गती मिळेल. (278 crore approved for Bodwad Irrigation Scheme jalgaon news)

अशी आहे तरतूद

नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या बैठकीत तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत वेगवर्धित सिंचन योजनेत या निधीला मान्यता मिळाली. या योजनेच्या टप्पा १ ची एकूण किंमत दोन हजार १४१ कोटी १९ लाख असून, कामाप्रीत्यर्थ किंमत एक हजार ९२३ कोटी ८१ लाख एवढी आहे.

आठ हजार हेक्टर क्षेत्रास लाभ

या योजनेचा समावेश प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजनेंतर्गत वेगवर्धित सिंचन योजनेत झाल्याने या टप्प्यांतर्गत विदर्भातील सहा हजार १६७ हेक्टर व अवर्षण प्रवण भागातील नऊ हजार ५०७ हेक्टर तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील सहा हजार ५४६ हेक्टर, बुलढाणा जिल्ह्यातील १३ हजार ७४३ हेक्टर व जळगाव जिल्ह्यातील आठ हजार ४७७ हेक्टर अशा एकूण २२ हजार २२० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा फायदा होणार आहे.

Funding
Pimprala Railway Flyover: पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलावरून ‘बायपास’ला जा 5 मिनिटांत..! पुलाचे 98 टक्के काम पूर्ण

मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार या कामाची उर्वरित किंमत ६९४ कोटी ८७ लाख आहे. त्यापैकी २७८ कोटी ६२ लाख तीन वर्षांत केंद्र सरकारमार्फत प्राप्त होतील. उर्वरित ४१६ कोटी २५ लाख शासनामार्फत खर्च करण्यात येणार आहेत.

एकत्रित प्रयत्न, पाठपुराव्यास यश

बोदवड परिसर सिंचन योजना कामाचा समावेश केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजनेंतर्गत वेगवर्धित सिंचन योजनेत करण्यासाठी खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यासंबंधी प्रस्तावाबाबत तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ज. द. बोरकर, अधीक्षक अभियंता य. का. भदाणे, कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन व कार्यकारी अभियंता उ. दे. दाभाडे यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता, केंद्र सरकार गुंतवणूक मान्यता, राज्य शासन गुंतवणूक मान्यता अशा विविध संविधानिक मान्यता प्राप्त करून केंद्राकडे संबंधित प्रकल्प पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समाविष्ट होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी प्रस्तावाच्या सद्यःस्थिती व कार्यवाहीबाबत केंद्र व राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून समन्वायाची महत्वाची भूमिका जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पार पाडली

Funding
Jalgaon News : जिल्ह्यात 3 महिन्यांनी माजी सैनिक दिवस : आयुष प्रसाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com