3 पिस्तुलासह तीन संशयित ताब्यात; 6 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पोलिस कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली तर दोन जण फरार झालेत.
Crime news
Crime newsesakal
Updated on

चोपडा (जि. जळगाव) : नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बोरअजंटी- वैजापूर रस्त्यावरील तेल्या घाटात सापळा रचून स्कार्पियो गाडी (एमएच १२ एफय ००६१) भरधाव वेगाने जात असताना पोलिसांनी तिला थांबवली. वाहनातील पाच जणांकडून तीन गावठी कट्टे व पंधरा काडतुसे, एक वस्तारा असा एकूण ६ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीन जणांना अटक करण्यात आली तर दोन जण फरार झालेत. सदर कारवाई शनिवारी (ता. २८) रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

तालुक्यातील बोरअजंटी- वैजापूर रस्त्यावरील तेल्या घाटात नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक व चोपडा ग्रामीण पोलिस यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी पहाटे सापळा रचण्यात आला. यावेळी बोरअजंटी हद्दीत आलेल्या स्कार्पियो गाडीला पोलिसांनी हात देऊन थांबवले असता गाडी थांबवून त्यातील पाच जण जंगलात पळू लागले. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून गणेश बाबासाहेब केदार (२४, रा. पाडळी, ता. पाथर्डी, जि. नगर) कालिदास दत्तात्रय टकले (२८, रा. हरताळा, ता. पाथर्डी, जि. नगर) विकास आप्पासाहेब गिरी (२२, ता. पाथर्डी, जि. नगर) यांना ताब्यात घेतले. यांच्या ताब्यातून ३४ हजार किंमतीचे तीन स्टीलचे गावठी बनावटीचे पिस्टल व १५ जिवंत काडतूसे, ५ लाख किंमतीची महिंद्रा कंपनीची स्कार्पियो व मोबाईल असा एकूण ६ लाख ३४ हजार किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोहेकॉ बशीर तडवी यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमर्टी येथील फरार दोघींचा शोध सुरू आहे.

Crime news
चोऱ्या रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल हा कॅमेरा; किंमत फक्त....
Crime news
धक्कादायक! 11 वर्षांपासून जन्मदात्या बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Girish Mahajan political retirement news
Fatal Car Accident on Washim Malegaon Road Parked Truck Collision Claims Life of Young Man From Shirpur Jain
Marathi News Esakal
www.esakal.com