धक्कादायक! 11 वर्षांपासून जन्मदात्या बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

बाप- लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक माहिती त्या युवतीने दिली आहे.
rape case
rape casesakal
Updated on

जन्मदात्या बापाने स्वतःच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद येथे हा प्रकार घडला असून मुलीच्या बापाने घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. तब्बल ११ वर्ष या नरकयातना भोगल्यावर युवती घरातून पळून गेली. मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला. खेळण्या बागडण्याच्या वयात तिच्यावर अत्याचार झाल्याने या घटनेसंदर्भात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

rape case
योग्यवेळ आली की आम्ही प्रत्येकाची काळजी घेतो, अजित पवारांचं स्पष्टीकरण

मिळालेली माहिती अशी की, १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिसांनी त्या बेपत्ता मुलीचा शोध घेऊन तिला परभणी जिल्ह्यातून औरंगाबादला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आणले. त्या मुलीला ठाण्यातील महिला अधिकाऱ्यांनी विश्वासात घेत विचारपूस केली असता. वडीलच अत्याचार करत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. बाप- लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक माहिती त्या युवतीने दिली आहे. मुकुंदवाडी व पुंडलीकनगर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता गुन्हा दाखल करून आरोपी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

संबंधित युवती अवघ्या ६ वर्षाची असल्यापासून बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. तब्बल ११ वर्षे या नरकयातना तिने निमूटपणे सहन केल्या आहेत. दीड महिन्यांपूर्वी पुन्हा आरोपी बापाने इच्छेविरुद्ध युवतीवर बलात्कार केला. त्यामुळे ती परभणी जिल्ह्यातील एका मित्राकडे पळून गेली होती, अशी माहिती तिने पोलिसांकडे दिली आहे. त्या मुलीच्या आरोपी बापा विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण पुंडलिकनगर पोलीस ठाणे हद्दीतील असल्याने झिरो ने तो वर्ग करण्यात आला आहे.

rape case
योग दिन, जपान दौरा अन् बरंच काही; PM मोदींनी सांगितली 'मन की बात'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Yellow date farming success story in Marathwada earning Rs 3 lakh per acre
Who can apply for BAMU direct admission 2026?
Food safety raid in Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com