Jalgaon News : जळगावच्या चिमुकल्याचा कुबेरेश्वर धाम येथे मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child Death

Jalgaon News : जळगावच्या चिमुकल्याचा कुबेरेश्वर धाम येथे मृत्यू

जळगाव : मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेरेश्‍वर धाम येथे जळगावच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना आज (ता.१७) समोर आली आहे. (3 year old child died at Kubereshwar Dham in Sehore jalgaon news)

या महोत्सवादरम्यान दोन दिवसांत दोन महिलांसह एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

रुद्राक्ष महोत्सवात जळगावचे विवेक विनोद भट गुरुवारी पत्नी आणि दोन मुलांसह गेले होते. महोत्सवाच्या ठिकाणी चालताना विवेक भट यांचा ३ वर्षांचा मुलगा अमोघ भटची तब्येत बिघडली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

चालताना तो अधिकच आजारी पडला. त्याला जवळच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी अमोघला मृत घोषित केले.

आमोघचा सिहोरमध्ये दफनविधी

अमोघ भट या बालकाचा दफनविधी सिहोरमध्येच करण्यात आला असल्याचे मृत बालकाचे वडील विवेक भट यांनी माध्यमांना माहिती दिली.

टॅग्स :Jalgaondeathchildren