मालवाहू टेम्पोच्या धडकेत 3 तरुणी जखमी

 Accident latest marathi news
Accident latest marathi newsesakal

बातमीदार : जीवन चव्हाण

चाळीसगाव (जि. नाशिक) : पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या तरुणी भडगाव रस्त्याने धावत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू टेम्पोने जोरदार धडक (Collision) दिल्याने झालेल्या अपघातात तिघ्या तरुणी गंभीर जखमी झाल्याची थरारक घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (3 young women injured in collision with cargo tempo jalgaon Latest Marathi News)

सविस्तर वृत्त, वंदना तुकाराम मोरे (वय-२३) रा. सरकारी दवाखाना, चाळीसगाव या तरुणींसह दीपाली चक्रधर महाजन व नंदिनी कैलास पाटील दोन्ही रा. पातोंडा ता. चाळीसगाव तिघेही पोलीस भरतीची तयारी करत आहे.

यासाठी त्या दररोज धावत असतात. दरम्यान गुरुवार, २१ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तरुणी ह्या भडगाव रस्त्याने धावत असतांना डांबरून फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव मालवाहू टेम्पोने जोरदार धडक दिली.

तेव्हा झालेल्या अपघातात वंदना मोरे हिच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन पाय फॅक्चर झाला. नांदणी पाटीलच्या शरीरावर गंभीर दुखापती झाल्या. तर दीपाली महाजन हिच्या डोक्याला व शरीराला मुका मार लागला.

 Accident latest marathi news
RPF कडून 6 महिन्यांत 745 मुलांची सुटका

घटना घडताच मालवाहू टेम्पो (क्र. एम.एच. १९ के. ए. २५७९) पसार होत असताना गावातील स्थानिकांनी त्याचा पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात दिला. तत्पूर्वी अपघातातील जखमी तरुणींना तातडीने एका दवाखान्यात उपचारकामी दाखल करण्यात आले.

प्रकृतीत थोड्या प्रमाणात सुधारणा झाल्याने वंदना मोरे या तरुणीच्या जाबजबाबावरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु आहे.6

 Accident latest marathi news
पोषण आहाराचे ऑडिट शाळा स्तरावर नको; शिक्षण आयुक्त मांढरेंना साकडे

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com