RPF कडून 6 महिन्यांत 745 मुलांची सुटका | Latest Marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RPF latest marathi news

RPF कडून 6 महिन्यांत 745 मुलांची सुटका

नाशिक : रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) रेल्वे मालमत्ता, प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी निभावतानाच "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत ६ महिन्यात 745 मुलांना वाचवण्याची जबाबदारीही पार पाडली.

जानेवारी २०२२ ते जून २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्मवरील ७४५ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ४९० मुले आणि २५५ मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन घडविले. (745 children rescued by RPF in 6 months nashik Latest Marathi news)

भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात.

हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी जवळीक साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात.

मुंबई विभागात सर्वाधिक ३८१ मुलांची सुटका झाली असून त्यात २७० मुले आणि १११ मुलींचा समावेश आहे.

भुसावळ विभागात १३८ सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून त्यात ७२ मुले व ६६ मुलींचा समावेश आहे.

पुणे विभागात १३६ सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून यामध्ये ९८ मुले आणि ३८ मुलींचा समावेश आहे.

नागपूर विभागात सुटका केलेल्या ५६ मुलांमध्ये ३० मुले आणि २६ मुलींचा समावेश आहे.

सोलापूर विभागात सुटका केलेल्या ३४ मुलांची नोंद झाली असून त्यात २० मुले व १४ मुलींचा समावेश आहे.

गेल्या वर्षी म्हणजे २०२१ च्या जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वे आरपीएफ ने शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६०३ मुले आणि३६८ मुलींसह ९७१ मुलांची सुटका केली आहे