Jalgaon : गतवर्षीच्या तुलनेत 30 टक्के जादा पाणीसाठा

Dam Reference Image
Dam Reference Imageesakal
Updated on

जळगाव : शहरासह जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत सिंचन प्रकल्पातील यंदा पाण्याचा जलसाठा २९ टक्क्यांनी जादा आहे. यामुळे भविष्यात सिंचनाची चिंता मिटली आहे. सोबत अनेक गावांत पाणीटंचाई नसेल असे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ८८.५ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे काही मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तर मोठ्या प्रकल्पांतही ६० टक्क्यांच्यावर पाणीसाठा आहे. (30 percent more water storage compared to last year Jalgaon Latest Marathi News)

जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. दहा ते वीस जून दरम्यान एक दोन वेळा जोरदार पाऊस झाला. नंतर मात्र चांगलीच ओढ दिली. जुलै महिन्यात मात्र जून महिन्यांच्या पावसाचा बॅकलॉग भरून निघाला. ऑगस्ट महिन्यात पंधरा ऑगस्टला दमदार पाऊस झाला. नंतर तब्बल तेरा दिवसांची पावसाने विश्रांती घेतली.

गुरवारी, शुक्रवारी दमदार पाऊस झाला. या पावसाने कपाशीला पावसाच्या रूपाने अमृत मिळाल्याने शेतकरी आनंदित आहेत. पिकांची वाढ होऊन पिके शेंगा लागण्याची स्थिती आहे. जिरायती कपाशीला बोंडे लागण्याची स्थिती आहे. यामुळे पाऊस गरजेचा होता. तो गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही प्रमाणात होत आहे. पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे.

Dam Reference Image
Nashik Crime : 75 लाखांचे विदेशी मद्य पाडळी शिवारातून जप्त

धरणनिहाय पाणीसाठा असा :

धरण....-पाणीसाठा.....आताची टक्केवारी....गतवर्षीची टक्केवारी

(दलघमी)

हतनूर--२१२.६४--६९.६५--३८.३४

गिरणा--३९७.८८--९७.६१--६६.०४

वाघूर--२३२.१५--७४.९१--६६.०४

अभोरा--३१७.६४--१००--१००

मंगरूळ--३३१.५५--१००--१००

सुकी--३७२.१०--१००--९८.०३

मोर--३२३.५५--८१.८३--५९.०३

अग्नावती--२९५.६०--२४.४२--१००

हिवरा--२८२.४०--२०.०५--१००

बहुळा--२५०.१४--५१.४६--३६.२३

तोंडापूर--३८५.२०--१००.००--५०.८६

अंजनी--२२५.०८--६८.२४--४४.१७

गुळ--२६७.०९--८२.१६--३१.६१

भोकरबारी--२३५.३०--२४.१६--१६.८४

बोरी---२६७.१०--१००--१००

मन्याड--३७३.४०--६९.४१--१००

"कपाशीची परिस्थिती चांगली आहे. पावसाने अधूनमधून हजेरी लावण्याची गरज आहे. अतिपाउस नको. तो नुकसानकारक ठरेल. अतिवृष्टी न होता तुरळक पाउस झाल्यास कपाशीचे उत्पन्न चांगले येईल. मागील वर्षी झालेले नुकसान भरून निघण्यास मदत होईल."

- गणेश झोपे, शेतकरी.

Dam Reference Image
कलाशिक्षक दत्ताजी राठोडांनी ‘I Pad’ने साकारले गणेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com